सी-सेक्शन झाल्यावर लगेचच दुसरं बाळ होऊ देणं धोकादायक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

बऱ्याच भारतीय सेलेब्रिटी स्त्रिया ज्यांनी आपल्या मुलाला सी-सेक्शन द्वारे जन्म दिला त्यांनी त्यानंतर लगेचच दुसऱ्या बाळंतपणात न जाण्याचा सुज्ञ निर्णय घेतला. उदाहरणार्थ अभिनेत्री आणि योगा-प्रेमी शिल्पा शेट्टीचं सी-सेक्शन झालं होतं आणि तिने जाहीरपणे सांगितलंय की ती आधी होती त्यापेक्षा आता खूपच जास्त सुडौल आहे.

विश्वास बसत नाही? तर मग हे वाचा जिथे तिने अगदी निक्षून तसं सांगितलंय!

तरी पश्चिमेकडे, अँजेलिना जोली ने मात्र ह्याच्या अगदी विरुद्ध असा निर्णय घेतला आणि तिची मुलगी शायलो चा जन्म झाल्यावर दोन वर्षांतच तिची जुळी मुलं नॉक्स आणि विविएन ह्यांचा जन्म झाला. आणि त्याचा परिणाम (आणि मला हे बोलायला भीती वाटतेय) सगळेच पाहू शकतात. ती मरतुकडी आणि थकलेली दिसायला लागली.

बऱ्याचदा जेव्हा स्त्रिया पहिलं मूल होऊ देण्याचा निर्णय उशिरा (वय वर्षं ३० च्या नंतर) घेतात तेव्हा त्या लगेचच  दुसऱ्या मुलाची घाई करतात. आपण त्यांच्या या निर्णयामागचा हेतू समजू शकलो तरी हेही समजून घेतलं पाहिजे की त्यामुळे एका आईच्या आरोग्याला खूप जास्त धोका उद्भवू शकतो.

खासकरून जर तुमचं पहिल्या वेळी सी-सेक्शन झालं असेल, तर तुम्ही तुमचं आरोग्य पूर्ववत होईपर्यंत पुरेशी विश्रांती घ्यायला हवी आणि शक्य तितकं ताणतणावापासून दूर राहायला हवं.

ह्या ५ धोक्यांपासून तुम्ही सावध राहायला हवं:

१. गर्भाशयाचं फाटणं

पहिल्या वेळी सी-सेक्शन झाल्यावर लगेचच दुसरं बाळंतपण प्लॅन करणाऱ्या स्त्रियांना सी-सेक्शन चे व्रण फाटण्याचा खरोखर धोका असतो.

२. फोलेट, आयर्न आणि कॅल्शियमच्या प्रमाणात घट

सी-सेक्शन झाल्यावर शरीर पूर्ववत व्हायला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यानंतर, तुम्ही लगेचच दुसरं बाळंतपण प्लॅन केलंत तर तुमच्या शरीरातल्या फोलेट, आयर्न आणि कॅल्शियम च्या प्रमाणात घट होऊ शकते. हे सर्व घटक बाळ निरोगी जन्मावं ह्यासाठी अत्यावश्यक असतात.

३. थकवा - शारीरिक आणि मानसिक

मातृत्वाच्या नवीन जबाबदारीबरोबरच शरीरातील व्हिटॅमिन्सच्या प्रमाणात झालेल्या घटीमुळे एका आईला खूप जास्त थकवा येऊ शकतो. आणि ह्या थकव्यामुळे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि चिडचिड होते.

४. कमजोर हृदय

गरोदर स्त्रीच्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण जवळजवळ ५०% ने  वाढतं, ज्यामुळे हृदयावर जास्तीचा ताण येतो. सी-सेक्शन द्वारे मुलाला जन्म दिल्यावर २ वर्षांच्या आतच दुसरं बाळ झाल्यास हृदयावर खूपच जास्त ताण येऊन ते कमजोर होतं.

५. खाली सरकलेला प्लसेंटा (गर्भ-वेष्टन)

ह्याला प्लसेंटा प्रेविआ असंही म्हणतात आणि ह्याचा अर्थ असा की तुमचा प्लसेंटा गर्भाशयामध्ये खालच्या बाजूस सरकलेला असतो आणि त्यामुळे बाळ व्हजायना मधून बाहेर येण्यास अटकाव होतो. ह्यामुळे गरोदरपणात असताना थोडाफार रक्तस्राव देखील होतो. सी-सेक्शनच्या संदर्भात, तुम्ही ते झाल्यावर लगेचच दुसरं बाळ प्लॅन केलंत तर प्लसेंटा प्रेविआ चा धोका वाढतो.

डॉक्टरांच्या मते दोन सी-सेक्शन डिलिव्हरीज च्या मध्ये २ ते ५ वर्षांपर्यंत अंतर ठेवणं उत्तम.

मग, तुमचं बाळ २ वर्षांचं झालं की दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग सुरु करा आणि सुरक्षित राहा!

हॅपी प्रेग्नन्सीज!

Translated by Anyokti Wadekar

loader