सी-सेक्शन बद्दलची सिक्रेट्स जी तुम्हाला तुमचे डॉक्टरही सांगणार नाहीत!

ज्या आयांना त्यांचं बाळ बाहेर यावं म्हणून पोट कापून घ्यावं लागलं, त्यांचं आयुष्य फार सोपं नसतं. होय, सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया असते आणि आपण सी-सेक्शन झालेल्या आयांना त्यांचं योग्य ते श्रेय देणं उचित ठरेल. तुम्हाला अॅनस्थेशिया, ऑपरेशनच्या आधीचे आणि नंतरचे नियम आणि इतर अनेक गोष्टी माहीत असतील, पण सी-सेक्शन शस्त्रक्रियेबद्दलच्या काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला कुणीही सांगणार नाही. तुमचे डॉक्टरही नाही!

ही आहेत सी-सेक्शन बद्दलची ५ सिक्रेट्स जी तुम्हाला तुमचे डॉक्टरही सांगणार नाहीत. 

१. सी-सेक्शन असलं तरी त्यात तुमच्या व्हजायनाचा संबंध येणार आहे 

तुमच्या बाळाचा बाहेर येण्याचा मार्ग वेगळा असेल, पण तुमच्या सी-सेक्शन डिलिव्हरीमध्ये तुमच्या व्हजायनाचा संबंध तरीही येणार आहे. मुख्यतः, डिलिव्हरीनंतर व्हजायना पटकन साफ करून घेतली जाते ज्याला व्हजायनल वॉश म्हणतात, पण सी-सेक्शन डिलिव्हरीमध्ये शस्त्रक्रियेनंतर होणारा रक्तस्राव साफ करण्यासाठी हा व्हजायनल वॉश शस्त्रक्रियेच्या आधी केला जातो. तसंच, शस्त्रक्रियेच्या आधी नर्स तुमच्या व्हजायनामध्ये कॅथेटर घालेल, त्यामुळे त्यासाठी तयार राहा. 

२. तुम्हाला थोडं ओढलेलं, खेचलेलं असं जाणवेल 

शस्त्रक्रियेदरम्यान तुमच्या पोटापासून खाली पायांपर्यंतचा भाग पूर्णपणे बधिर असेल. पण बाळ तुमच्या पोटातून ओढून बाहेर काढलं जात असताना तुम्हाला ओढलं गेलेलं आणि खेचलं गेलेलं जाणवेल. त्यामुळे त्यासाठी तयार राहा. 

३. शस्त्रक्रियेदरम्यान तुम्हाला खूप थंडी वाजेल 

इतर शस्त्रक्रियांसाठी ऑपरेशन थिएटर्स थंड ठेवली जातात पण सी-सेक्शन डिलिव्हरीजमध्ये बाळाचं आगमन सोपं व्हावं म्हणून तापमान वाढवलं जातं. शिवाय, जवळजवळ अर्धा तास अर्धनग्न अवस्थेत पडून राहिल्याने तुम्हाला नक्कीच हुडहुडी भरेल. 

४. स्टूल सॉफनर्स तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतात 

सी-सेक्शन नंतर शौचाला जाणं खूप मोठी समस्या बनू शकते. तुमचं पोट पूर्ववत होण्याची प्रक्रिया अजूनही चालू असताना जोर काढून शौच बाहेर ढकलणं कठीण होत असल्याने, स्टूल सॉफनर्स तुमची ह्या प्रक्रियेत मदत करू शकतात आणि मग तुम्ही निश्चिन्त होऊ शकता. आठवणीने भरपूर पाणी प्या. आणि नाही, तुम्ही शौच करताना तुमचे टाके फाटणार नाहीत. 

५. रक्तस्राव होईल 

तुम्ही जरी तुमच्या व्हजायना मधून बाळाला ढकलून बाहेर काढलं नसलं तरी तुमचा रक्तस्राव होणं अटळ आहे. अखेर, तुमचं गर्भ-वेष्टन (प्लसेंटा) बाहेर काढल्यावर गर्भाशयाच्या भिंती पूर्ववत व्हायच्या असतात. शिवाय, गरोदरपणाच्या पूर्ण काळात तुमच्या बाळाला जे आधार देत होतं ते अस्तर पुढच्या काही आठवड्यांत तुमच्या शरीरातून बाहेर पडणार असतं. असं असलं तरी काळजी करू नका कारण हा रक्तस्राव खूप मोठा असणार नाही. 

फीचर इमेज स्रोत: यिडिश डॉट फॉरवर्ड डॉट कॉम 

Translated by Anyokti Wadekar

loader