गरोदर स्त्रियांनी ही ६ घरकामं करणं “धोक्याचं” आहे!

आया म्हणजे ऊर्जा आणि कष्टाचं प्रतीक असतात. पण जेव्हा त्यांच्या शरीराच्या आत एक बाळ बनत असतं, तेव्हा बऱ्याचदा त्या सांभाळून राहायला विसरतात. ह्या ६ गोष्टी, होणाऱ्या आयांनी काहीही करून टाळल्या पाहिजेत. वाचा आणि तुमच्या इतर गरोदर मैत्रिणींसोबत शेअर करा!

इथून निवडले आहे: क्युअरजॉय

१. बाथरूम साफ करणं

आपल्याला माहितीय बाथरूम साफ करताना खूप केमिकल्स लागतात. गरोदर स्त्रियांच्या शरीरात श्वासावाटे विषारी केमिकल्स जाता कामा नयेत. गरोदर असताना तुमचा प्राथमिक नियम हा असला पाहिजे की - "जर कुठल्याही वस्तूचा उग्र वास येत असेल, तर ती वस्तू टाळली पाहिजे". बाथरूम साफ करण्याचं काम दुसऱ्या कुणावर तरी सोपवा आणि तुम्ही स्वतः बाथरूम साफ करायचं ठरवलंत तर त्यासाठी लागणारं साहित्य, लिंबाचा रस, पांढरं व्हिनेगार आणि बेकिंग सोडा ह्यापासून स्वतः बनवा. बाथरूम मध्ये फ्रेशनर म्हणून वापरण्यात येणारी काही इसेन्शल आॅइल्स सुद्धा होणाऱ्या आईच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

२. व्हॅक्यूम क्लिनिंग आणि लादी पुसणं

तुम्ही काय निवडाल? आराम करणं आणि गरोदरपणाचा आनंद घेणं की घर स्वच्छ केल्यावर आणि लादी पुसल्यावर 'सायाटिका' ह्या प्रकारची वेदना सहन करणं? तुमचं उत्तर कळलं! होय, गरोदरपणात व्हॅक्यूम क्लिनिंग केल्यामुळे आणि लादी पुसल्यामुळे 'सायाटिका' हा वेदनेचा प्रकार होऊ शकतो. ह्या प्रकारात पाठीचं दुखणं अजून वाढतं. पुढच्या बाजूला वाकावं लागेल अशी कामं केल्यामुळे पाठीच्या खालच्या बाजूस अधिकाधिक वेदना होऊ लागतात. गरोदरपणात वजन वाढल्यामुळे 'सायाटिका' ही वेदना होणं सर्वसाधारण आहे. तेव्हा गरोदरपणात कार्पेट साफ करणं किंवा किचन ची लादी पुसणं टाळा. ते काम दुसऱ्या कुणावर तरी सोपवा आणि तुम्ही गरोदर स्त्रियांनी फक्त आराम करा!

३. कपडे धुणं आणि वाळत घालणं

वेळेच्या आधीच प्रसूती वेदना होणं आणि उच्च रक्तदाब हे कपडे धुण्याच्या कामामुळे होतात. तुमची डिलिव्हरी होईपर्यंत कपडे धुण्याचं हे कठीण काम थांबवा (असंही ते कधीच न संपणारं काम आहे). सध्या, जोपर्यंत तुम्ही गरोदर आहात, तोपर्यंत हे काम दुसऱ्या कुणाकडून करून घ्या. खाली वाकणं आणि लॉंड्री बास्केट किंवा बादल्या उचलणं यामुळे फक्त तुमच्या पाठीवर ताण येईल. तुमची मुलं थोडी मोठी असतील, तर त्यांना कपडे उचलून वाळत घालण्यात तुम्हाला मदत करायला सांगा. ती नक्कीच आनंदाने तुम्हाला मदत करतील.

४. पाळलेल्या प्राण्याची शी-शू साफ करणं

उग्र केमिकल्स प्रमाणेच मांजरीच्या लिटर-बॉक्स मधल्या शी मुळे तुम्हाला गरोदरपणात त्रास होऊ शकतो. मांजरीच्या शी मधून संक्रमित होणाऱ्या इन्फेक्शन्स चा बाळावर परिणाम होऊ शकतो. फॅमिली मधल्या दुसऱ्या कुणाला तरी हे शी साफ करण्याचं काम करायला सांगा. जर तुम्ही हे काम करत असाल, तर इन्फेक्शन्स पासून संरक्षण म्हणून ग्लोव्हज आणि मास्क चा वापर करा. काम झाल्यावर हात नीट स्वच्छ धुवून घ्या.

५. जड वस्तू उचलणं

जड वस्तू उचलायचं टाळा. कितपत वजन उचलणं सुरक्षित आहे ह्याबद्दल तुमच्या हेल्थकेअर प्रोव्हायडर ने तुम्हाला सल्ला दिलाच असेल. जसजसं तुमचं पोट वाढू लागतं, तसतसा तुमच्या पाठीवर जास्तीत जास्त ताण येत जातो. जास्तीचं वजन उचलल्यामुळे तुमच्या पाठीवर ताण येईल आणि ती अजून जास्त दुखू लागेल. जड वजन उचलताना सावध राहा. जमिनीपासून वस्तू वर उचलताना उकिडवे बसून उचला आणि पुढच्या बाजूला वाकू नका.

६. सीलिंग फॅन साफ करणं आणि पडदे टांगणं

तुम्हाला तुमच्या चालीत झालेला फरक आतापर्यंत जाणवला असेल. गरोदर स्त्रियांच्या बाबतीत, त्यांच्या शरीराचं गुरुत्वाकर्षण केंद्र बदलतं. त्यामुळे तुम्ही धोकादायकपणे पडण्याची शक्यता असते, खास करून जर तुम्ही उंचावर कुठे चढलात की. सीलिंग फॅन साफ करण्यासाठी किंवा पडदे टांगण्यासाठी कधीही शिडीवर चढू नका. खाली पडण्याचा धोका टाळण्यासाठी हे काम घरातल्या दुसऱ्या कुणाला तरी द्या किंवा नोकराची मदत घ्या.

Translated by Anyokti Wadekar

loader