तुमचं नवजात बाळ कधीच आजारी पडणार नाही, फक्त या ६ गोष्टी ध्यानात ठेवा!

हे अगदी खरं आहे की तुम्ही जेव्हा कधी डॉक्टरकडे स्वतःला किंवा तुमच्या बाळाला दाखवायला घेऊन जाता, तेव्हा डॉक्टर तुमच्याद्वारे सांगितलेल्या समस्येच्या आधारावर देखील औषधं किंवा तपासण्या लिहून देतात. म्हणून, तुमचा हा प्रयत्न असला पाहिजे की जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जात असाल खासकरून आपल्या बाळाला दाखवायला, तेव्हा डॉक्टरला सर्व गोष्टी मोकळेपणाने सांगा. कारण काही स्त्रियांना डॉक्टरशी खुलेपणाने बोलायला लाज वाटते, ज्याची फळं त्यांना त्रास काढून भोगावी लागतात. खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्ही ध्यानात ठेवल्या पाहिजेत, त्या खालीलप्रमाणे आहेत-

आवश्यकतेपेक्षा जास्त इंटरनेटचा सल्ला घेऊ नका

आजकाल लोकांचा पहिला डॉक्टर जर कुणी असेल तर तो आहे इंटरनेट, ज्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. अशात, गरजेपेक्षा जास्त इंटरनेटवर सर्चही करू नका आणि त्यावर सांगितल्या गेलेल्या दिशांचं आणि सल्ल्यांचं पालनही करू नका. कारण हे तुमच्या बाळासाठी घातक ठरू शकतं. म्हणून इंटरनेट ऐवजी डॉक्टरला संपर्क करणं जास्त सुज्ञपणाचं ठरेल.

नेहमी अँटीबायोटिक्सचा आधार घेऊ नका

सहसा लोक व्हायरल फ्लू किंवा इतर संक्रमणाच्या विळख्यात येताच अँटीबायोटिक्स घेणं चालू करतात जे योग्य नाही. ही अँटीबायोटिक्स भले तुम्हाला पटकन बरं करण्याचं काम करत असतील पण त्यामुळे तुमच्यात बॅक्टीरियल संक्रमण होण्याचा धोका देखील असतो.

ताप आल्यास घाबरू नका

जेव्हा कधीही नवजात बाळाला ताप येतो तेव्हा पालक खूप जास्त चिंतित होऊन जातात आणि मग त्यांच्या डॉक्टरकडे फेऱ्या सुरु होतात. परंतु ताप आल्यावर खूप जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण आजकाल लहान सहान कारणांनी देखील बाळं तापाच्या विळख्यात येतात, जसं की सर्दी, खोकला, जुलाब इत्यादी झाल्यामुळे सुद्धा बाळाला ताप येतो. परंतु, जर बाळाला दोन किंवा त्याहून अधिक दिवस तापाची समस्या असेल तेव्हा तुम्ही बालरोगतज्ज्ञाला संपर्क केला पाहिजे.

वेळेवर लसी टोचून घ्या

बाळाला प्रत्येक लस योग्य वेळेवर दिली गेली पाहिजे. जेणेकरून तुमच्या बाळाला कुठल्याही प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागता कामा नये. म्हणून, डॉक्टरच्या मदतीने आपल्या बाळाला साऱ्या लसी द्या, कारण याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं.

बाळाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या

आपल्या नवजात बाळाला नेहमी स्वच्छ ठेवा, कारण आजकाल लहान मुलं रोगसंक्रमणाला सर्वात अधिक बळी पडतात. अशा वेळी, त्यांच्या कानांपासून पूर्ण शरीराची स्वच्छता अगदी लक्षपूर्वक केली गेली पाहिजे.

नियमित चेक-अप करून घेत राहा

केवळ बाळाचीच नाही तर स्वतःची देखील नियमित तपासणी केली गेली पाहिजे. जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या समस्येपासून वाचू शकाल. आपल्या कामाच्या व्यग्रतेमधून देखील यासाठी जरूर वेळ काढा, जेणेकरून तुम्ही तुमच्या बाळाला आजारी पडण्यापासून वाचवू शकाल.

या सगळ्याव्यतिरिक्त जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही कारण जेव्हा तुम्ही ह्या आरोग्यपूर्ण सवयींचा समावेश आपल्या जीवनशैलीमध्ये कराल, तेव्हा तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही.

 

Transated by Anyokti Wadekar

loader