बाळंतपणानंतर स्त्रियांनी जरूर करावीत ही ६ कामं, त्यामुळे त्या खूप लवकर बऱ्या होतील

स्त्रिया केवळ गर्भावस्थेतच चिंतेत आणि ताणतणावात असतात असं नाही तर बाळाच्या जन्मानंतर त्यांची चिंता आणखी वाढते. काही स्त्रिया तर बाळंपणानंतर डिप्रेशन मध्ये जातात ज्याला आपण पोस्टपार्टम डिप्रेशन या नावाने ओळखतो. ज्याचा परिणाम फक्त तुमच्यावरच होत नाही तर कुठे ना कुठे बाळावर देखील त्याचा परिणाम होत असतो. कारण जेव्हा तुम्ही ह्या समस्येने पीडित असता तेव्हा तुम्ही बाळाची योग्य प्रकारे देखभाल करू शकत नाही. यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्या ध्यानात ठेवून तुम्ही या प्रकारच्या समस्येपासून स्वतःला वाचवू शकता, या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत-

स्वतःवर प्रेम करा

काही स्त्रियांना असं वाटतं की बाळ झाल्यावर त्यांचं जगच संपून जातं. पण असं नाही आहे, तुम्ही बाळ झाल्यावरही स्वतःला सांभाळू शकता, आणि यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःसाठी वेळ काढा. यासाठी आवश्यक आहे की बाळंतपणानंतर तुम्ही पेडीक्योर, मॅनिक्योर, फुल बॉडी मसाज, नवीन हेअरकट इत्यादी करावं. त्यामुळे तुम्हाला खूप छान आणि वेगळं वाटेल.

शक्य तेवढा आराम करा

बाळंतपणात स्त्रियांच्या नशिबी सुखाची झोप नसते, आणि ही समस्या तुमच्यासोबत बाळाच्या जन्मानंतर देखील राहते. कारण बाळं रात्री खूप वेळा उठतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्यासोबत जागं राहावं लागतं, म्हणून तुम्ही दिवसा तुमची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल.   

मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारा

असं तर नाहीये की तुम्हाला एकही मैत्रीण नसेल, तर मग या वेळी तुम्ही एक तर आपल्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावून खूप साऱ्या गप्पा मारू शकता किंवा मग त्यांच्याशी फोन वर बोला. यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुमच्या जुन्या दिवसांच्या आठवणीही ताज्या होतील.

पती सोबत वेळ घालवा

बाळंतपणानंतर तुम्ही तुमच्या पतीला वेळ द्यायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला खूप छान फील होईल. तुम्ही तुमच्या बाळाला घरी आजी-आजोबांसोबत ठेवून काही वेळासाठी आपल्या पतीबरोबर बाहेर जाऊ शकता. ज्यामुळे तुमच्या पतीलाही छान वाटेल.

व्यायाम करा

स्वतःला लवकर ठीक करण्यासाठी तुम्ही सकाळच्या वेळी हलका-फुलका व्यायाम करा, त्यामुळे तुमच्या शरीराला बराच आराम आणि उत्साह मिळेल. ताणतणाव कमी करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे.

टीव्ही बघा किंवा पुस्तकं वाचा

काही लोकांना टीव्ही बघायला आवडतं तर काही लोकांना पुस्तकं वाचणं. म्हणून मोकळ्या वेळात जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर तेव्हा तुम्ही पुस्तकं वाचा किंवा टीव्ही वर आपले आवडते कार्यक्रम बघा. यामुळे तुम्हाला छान वाटेल आणि त्यासोबतच इकडच्या-तिकडच्या गोष्टींनी तुमचं लक्षही विचलित होईल.

या सगळ्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या बाळासोबत खेळा आणि त्याच्या गतिविधींकडे लक्ष द्या. त्यासोबतच तुम्ही, जी तुम्हाला आवडतात, अशी काही क्रिएटिव्ह कामं देखील करू शकता.

 

Translated by Anyokti Wadekar

loader