बाळाला शरीराच्या कोणत्या भागात सर्वात जास्त थंडी वाजते?

थंडीच्या मोसमात जर कुणाला सर्वात जास्त सुरक्षेची गरज असेल तर ती असते नवजात बाळाला. कारण या दिवसांत सर्वाधिक थंडीचा त्रास होण्याचा धोका असतो आणि या वयात बाळांची रोगप्रतिकारशक्ती एवढी बळकट नसते, की बाळ स्वतःची त्यापासून सुरक्षा करू शकेल. आपल्या बाळाच्या शरीराचे काही भाग असे असतात, ज्यांची सुरक्षा तुम्ही थंडीच्या मोसमात केली पाहिजे. असं यासाठी केलं पाहिजे, कारण या भागांत बाळाला सर्वात अधिक थंडी वाजते, ज्याबद्दल खाली सांगितलं गेलं आहे-

डोकं

 

नवजात बाळाला सर्वाधिक थंडी डोक्याला लागत असते, आणि डोकं हा अवयव पूर्ण शरीराला प्रभावित करत असतो. यासाठी, प्रयत्न करा की या दिवसांत बाळाचं डोकं झाकून ठेवलं जाईल, रात्री झोपताना सुद्धा त्याला टोपी घालून झोपवायला हवं. पण लक्षात ठेवा, सुती कापडाच्या टोप्याच वापरा, कारण लोकरीच्या टोपीने बाळाला रॅशेसचा त्रास होऊ शकतो किंवा अस्वस्थ वाटू शकतं.

पाय

 

तुम्ही बऱ्याचदा हे अनुभवलं असेल की नवजात बाळाचे पाय बर्फासारखे थंड असतात. कारण या वयात बाळं  हात-पाय खूप जास्त आदळत राहतात त्यामुळे त्यांचे पाय अंथरुणाच्या बाहेर येतात. अशात, असा प्रयत्न करा की बाळाच्या पायात मोजे असतील. परंतु जेव्हा बाळाला उन्हात घेऊन जाल तेव्हा पायातले मोजे काढून ठेवा.

हात

पायांप्रमाणेच बाळाच्या हातांना देखील खूप थंडी वाजते, म्हणून बाळाच्या हातांत सुती हातमोजे घालून ठेवा. पण रात्री झोपताना ते काढून ठेवा कारण काही बाळांना या हातमोज्यांमुळे अस्वस्थ वाटतं.

नाक

थंडीमुळे बाळाचं नाक अगदी बर्फासारखं थंड पडतं. म्हणून बाळाच्या नाकाला हलक्या उबदार हातांनी शेक द्या किंवा बाळाला उबदार अशा खोलीत ठेवा. कारण या दिवसांत बाळाचं नाक चोंदण्याची समस्या उद्भवते. जर बाळाचं नाक चोंदलं असेल तर बाळाच्या गादीच्या उशाशी, गादीखाली एक-दोन जुनी टॉवेल्स लावून तो भाग थोडा उंच करा.

बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे?

खाली काही उपाय सांगितले गेले आहेत ज्यांच्या आधारे तुम्ही बाळाची सर्दीच्या समस्येपासून सुटका करू शकता-

कोमट तेलाने मालिश

बाळाची कोमट राईच्या तेलाने मालिश करा, यामुळे बाळाला केवळ सर्दीपासूनच आराम मिळणार नाही तर त्याच्या शरीराला ऊबदेखील मिळेल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या तेलात एक जायफळ देखील टाकू शकता कारण जायफळ उष्ण असतं आणि बाळाच्या मालिशसाठी फायदेशीर मानलं जातं.

स्तनपान

जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, बाळाला कमीत कमी एक वर्षापर्यंत आईचं दूध दिलं गेलं पाहिजे. कारण यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती बळकट होते आणि मग बाळ कुठल्याही रोगाशी लढण्यास सक्षम बनतं. खासकरून, स्तनपानामुळे सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शन्स पासून बाळ स्वतःचा अधिक चांगला बचाव करू शकतं.

कोमट पाण्याने आंघोळ

बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घाला, पण लक्षात ठेवा, आंघोळ घालताना न्हाणीघराचे दरवाजे बंद असायला हवेत. तसंच आंघोळ झाल्यावर बाळाला लगेचच कोरड्या टॉवेलमध्ये लपेटा जेणेकरून बाहेरची थंड हवा त्याला लागणार नाही.

उन्हामध्ये ठेवा

या दिवसांत बाळाला ऊब मिळावी म्हणून त्याला उन्हात बसवा. यामुळे त्याला हवी ती ऊब मिळेल आणि त्यासोबतच बाळ आपल्या हातापायाची हालचाल करू लागेल.

या उपायांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या बाळाला थंडीपासून वाचवू शकता आणि त्याला निरोगी ठेवू शकता.

 

Translated by Anyokti Wadekar

loader