व्हिटॅमिन ई कॅप्सूल कुठे व कशी वापरावी?

व्हिटॅमिन ई मध्ये असणाऱ्या अँटिआॅक्सिडंट्सचे गुण तुमच्या चेहऱ्यापासून ते केसांसाठी बरेच फायदेशीर असतात. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे आहे की तुम्ही याचा वापर योग्य तऱ्हेने करता की नाही. कारण याचा वापर जर योग्य तऱ्हेने केला तर याचे परिणाम तुम्हाला आठवडाभरात दिसू लागतील. यासाठी आज आम्ही तुम्हाला याचे फायदे आणि याचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत. ते खाली दिल्याप्रमाणे आहे-

ओठांसाठी

व्हिटॅमिन ई चा वापर तुम्ही तुमच्या ओठांवर देखील करू शकता कारण हे तुमच्या ओठांना मुलायम आणि चमकदार बनवतं. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल मधलं लिक्विड काढून ते बदाम तेलात किंवा ग्लिसरीन मध्ये मिक्स करून तुमच्या ओठांवर झोपण्याच्या आधी लावा यामुळे तुमचे ओठ काही दिवसांतच सॉफ्ट आणि चमकदार दिसू लागतील.

चेहऱ्यासाठी

इमेज स्रोत: Pinterest

व्हिटॅमिन ई कॅप्सूल चा वापर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा सहजगत्या करू शकता. हे तुमच्या त्वचेला कोरडी होण्यापासून वाचवतं आणि तिला चमकदार बनवतं. यासाठी तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या आधी बदाम तेलात किंवा खोबरेल तेलात हे मिक्स करून चेहऱ्यावर लावा. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याचा वापर तुमच्या मॉइश्चरायझर, लोशन किंवा स्क्रब मध्ये मिसळून सरळ चेहरा आणि मानेवर करू शकता. कारण यामुळे तुमची त्वचा बरीच गुळगुळीत बनते.

डोळ्यांसाठी

इमेज स्रोत: mybuddy.com

डोळ्यांखालील काळी वर्तुळं किंवा मग थकलेल्या डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ई चा वापर चांगला मानला जातो. अशा वेळी तुम्ही व्हिटॅमिन ई ऑईलला सरळ आपल्या डोळ्यांखाली लावून रात्रभर तसंच सोडून द्या. याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांतच दिसू लागेल.

केसांसाठी

इमेज स्रोत: Dainik Bhaskar

व्हिटॅमिन ई चा वापर तुम्ही फक्त त्वचेवर न करता तुमच्या केसांसाठीही करू शकता. तुम्ही नेहमी वापरत असलेल्या तेलात मिसळून तुम्ही व्हिटॅमिन ई चा उपयोग करू शकता. याचा वापर केस धुण्याआधी एक दिवस करा, त्यासाठी खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई तेल चांगल्या प्रकारे मिसळून आपल्या केसांना लावा आणि मग सकाळी शॅम्पूने केस धावून टाका.

स्ट्रेच मार्क्स पासून सुटका

इमेज स्रोत: Healthnbodytips.com

स्त्रियांमध्ये गरोदरपणादरम्यान सर्वात अधिक स्ट्रेच मार्क्सची समस्या दिसून येते. अशा वेळी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल्स मध्ये बदाम तेल किंवा खोबरेल तेल मिसळून स्ट्रेच मार्क्स वर लावा. यामुळे ते डाग फिके होऊ लागतील.

इमेज स्रोत: Mirror.co.uk

याव्यतिरिक्त तुम्ही याचा वापर फेस पॅक मध्ये मिसळून देखील करू शकता, कारण कधी कधी जेव्हा तुम्ही फेस पॅक लावता तेव्हा तुमची त्वचा ओढल्यासारखी होते. अशा वेळी तुम्ही तुमच्या फेस पॅक मध्ये मिसळून हे लावा ज्याने तुमची त्वचा बरीच तजेलदार आणि मुलायम दिसेल.

फीचर इमेज स्रोत: YouTube

Translated by Anyokti Wadekar

loader