कुठल्या प्रकारच्या वेस्टर्न कपड्यांवर सिंदूर लावणं चांगलं दिसतं?

आपल्या भारत देशात कुंकवाचं एक वेगळंच महत्त्व आहे, जे लग्न झालेली प्रत्येक सौभाग्यवती स्त्री लावते. कुठल्याही विवाहित स्त्रीची कुंकू, मंगळसूत्र आणि चुडा ही एक ओळख असते. पण आजकालच्या बदललेल्या काळात स्त्रियांनी लग्नानंतर कुंकू लावणं आणि मंगळसूत्र चुडा घालणं जवळजवळ बंदच केलं आहे. कारण लग्नानंतर त्या आपल्या जुन्या लाईफस्टाईल नुसारच जगणं पसंत करतात. पण काही महिलांना असं वाटतं की वेस्टर्न ड्रेस वर कुंकू लावणं चांगलं दिसत नाही. पण तसं पाहायला गेलं तर कुंकू किंवा सिंदूर लावणं बरंच छान दिसतं आणि ते आजकाल ट्रेंड मध्ये सुद्धा आहे.

हल्लीच काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय वेस्टर्न कपड्यात पण सिंदूर लावलेली दिसून आली. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. अशाच प्रकारे खाली दिलेल्या वेस्टर्न ड्रेस सोबत तुम्ही सुद्धा सिंदूर लावू शकता कारण ते सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे.

जॅकेट सोबत

आता तुम्ही स्वतःच हे पाहू शकता की या ड्रेस वर सिंदूर लावल्याने किती सुंदर आणि स्मार्ट लुक आलाय. कारण काही स्त्रियांना लग्नानंतर एक वर्षापर्यंत सिंदूर, चुडा आणि मंगळसूत्र घालणं अनिवार्य असतं.

ऑफिस लुक

इथे तुम्ही पाहू शकता की या महिलेने फक्त सिंदूर लावला नाहीये तर एक मोठीशी टिकली सुद्धा लावलीये, ज्यामुळे तिला एक इंडो वेस्टर्न लुक प्राप्त झालाय.

इंडो वेस्टर्न लुक

अशा प्रकारच्या ड्रेस वर सुद्धा तुम्ही सिंदूर लावू शकता जो तुमच्यावर फारच शोभून दिसेल. कारण तो तुम्हाला एक पूर्णपणे रॉयल असा लुक देईल.

फेअर लुक

तुम्ही इथे पाहू शकता की दिव्यांकाने फक्त सिंदूर आणि लिपस्टिक लावून स्वतःला हायलाईट केलं आहे. त्याव्यतिरिक्त तिने कोणताही मेकअप केलेला नाही. पण ह्या लुक मध्ये तिचं रूप छान उठून दिसतंय.

म्हणून जर तुम्ही वेस्टर्न कपड्यांवर सिंदूर लावायचा विचार करत असाल तर बिनधास्त लावा कारण त्यामुळे तुम्हाला एक ‘क्लासी’ लुक प्राप्त होतो.

 

Translated by Anyokti Wadekar

loader