लग्नानंतर नव्या नवरीने घालावेत असे सूट आणि साड्या, दिसाल सगळ्यांहून जास्त सुंदर

प्रत्येक मुलीसाठी तिच्या लग्नाचा क्षण खूप महत्त्वाचा असतो, ज्याचं स्वप्न ती लहानपणापासूनच सजवत असते. पण जेव्हा तिची नववधू बनण्याची वेळ येते तेव्हा लग्नाच्या तयारीमध्ये कित्येक महिने निघून जातात. कारण नववधूला सगळ्यांहून वेगळं आणि खास दिसायचं असतं. परंतु, बहुतांश मुली आपलं सगळं लक्ष लेहेंग्यावरच केंद्रित करतात. त्या हे विसरतात की लग्नानंतर पुढे एक आठवड्यापर्यंत तिचा पेहराव सगळ्यांहून अगदी वेगळा दिसला पाहिजे.

आज आम्ही तुम्हाला काही अशा सलवार-सूट आणि साड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही पर्याय म्हणून नक्की विचार करा-

गुलाबी आणि निळा

https://www.instagram.com/p/Bc4hC2HHW5C/

हल्लीच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचं लग्न झालं. अनुष्काने यावेळी परिधान केलेली हरेक स्टाईल ट्रेंड झाली. तिच्या लग्नानंतर तिने घातलेले ड्रेस सुद्धा खूपच सुंदर होते. तुम्ही स्वतः हे दोन फोटो पाहू शकता ज्यामध्ये ती अगदी नव्या-नवेल्या वधू प्रमाणे दिसत होती. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे ब्राईट रंगाचे सलवार-कमीज शिवून घेऊ शकता. कारण अशा रंगाचे कपडे फार सुंदर दिसतात.

कांजीवरम किंवा सिल्कची साडी

लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्की ट्राय करा कारण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरात कुठली ना कुठली पूजा नक्की असते. अशा वेळी तुमच्यावर अशा प्रकारच्या लाल रंगाच्या साड्या फार शोभून दिसतील. भांगात पुरेपूर कुंकू भरायला मात्र विसरू नका कारण त्यामुळे तुम्ही नवपरिणीत वधू म्हणून अगदी शोभून दिसाल.

गुलाबी पतियाळा

लग्नानंतर तुम्ही घरी असा गुलाबी रंगाचा पतियाळा ड्रेस घालू शकता कारण अशा प्रकारचे कपडे नव्या नवरीवर खूप शोभून दिसतात.

चेरी रेड

लग्नाच्या पहिल्या सकाळी बऱ्याच ठिकाणी नववधूच्या संदर्भातले काही विशिष्ट विधी असतात. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे तयार होऊ शकता. कारण या प्रसंगांसाठी अशा प्रकारचे कपडे आणि मेकअप खूप शोभून दिसतील.

तसं बघायला गेलं तर गुलाबी हा रंग मुलींचा फार आवडता असतो. अशात, जर तुम्ही नवऱ्यासोबत पूजेसाठी जात असाल तर असा 'लुक' परिधान करू शकता. तुमच्या नवऱ्याची नजर तुमच्यावर अगदी खिळून राहील.

वर सांगितल्या गेलेल्या टिप्सचा वापर करून तुम्ही फक्त लग्नाच्या दिवशीच नव्हे, तर त्यानंतरही सुंदर दिसू शकता.

 

Translated by Anyokti Wadekar

loader