थंडीत सुद्धा तुमच्या त्वचेवरील चमक कायम राहील, फक्त आठवड्यातून तीनदा हे काम करा

मुली आपल्या सौन्दर्याच्या बाबतीत नेहमी सजग असतात आणि यासाठी त्या पार्लरच्या वाऱ्या देखील करतात. खासकरून, थंडीमध्ये त्वचा आणखीनच खरखरीत होते, ज्यामुळे ती निस्तेज दिसते आणि चेहरा सुस्तावलेला दिसतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की असे काही नैसर्गिक पदार्थ आहेत, ज्यांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची हरवलेली कांती पुन्हा मिळवू शकता.

खाली काही टिप्स सांगितल्या गेल्या आहेत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या त्वचेची चमक कायम राखू शकता. या टिप्स खालीलप्रमाणे आहेत-

मध

चेहऱ्यासाठी मध म्हणजे एखादं टॉनिकच जणू. कारण यामध्ये त्वचेला आर्द्र ठेवण्याची क्षमता असते. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेच्या थरांमध्ये खोलवर पोहोचतं. तुमची त्वचा या ताज्या आणि नैसर्गिक मॉइश्चरायझरमुळे बराच वेळपर्यंत हायड्रेटेड राहते. म्हणून, चेहरा धुवून एखाद्या कपड्याने पुसून कोरडा करा आणि मधाचा पातळ थर चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

संत्रं

या मोसमात संत्र्याच्या सालीच्या मदतीने तुमच्या रुक्ष आणि निर्जीव त्वचेला जीवदान मिळेल. कारण संत्र्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' असतं जे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. संत्र्याच्या साली देखील त्वचेवर गुणकारी पद्धतीने काम करतात. याचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीची पावडर, मध आणि लिंबाचा रस हे तिन्ही पदार्थ एकत्र मिसळून घ्या. मग हा पॅक चेहऱ्यावर अर्धा तास लावून मग धुवून टाका. तुम्हाला चेहऱ्याच्या त्वचेत फरक दिसू लागेल.

बीटरूट

त्वचा गुलाबी बनवण्याचा बीटरूट हा एक नैसर्गिक उपाय आहे. बीटरूटचे काही तुकडे कापून घ्या, व त्यांचा रस काढून त्यात थोडं ग्लिसरीन मिसळून गालांवर लावा. काही दिवसांतच तुमच्या चेहऱ्याची त्वचा उजळ आणि गुलाबीसर दिसू लागेल.

लिंबू आणि दूध

लिंबाच्या रसात दूध मिसळून त्या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचं रक्ताभिसरण देखील चांगलं होईल, आणि चेहऱ्यावर छान 'ग्लो' देखील येईल.

स्क्रब सुद्धा आवश्यक आहे

आठवड्यातून दोन वेळा त्वचेला स्क्रब जरूर करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील आणि त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्यासोबतच पिंपल्स होण्याचा धोकाही कमी होतो. पण स्क्रब करताना खूप जोरजोरात स्क्रब करू नका. त्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते.

द्रव पदार्थांचं सेवन करा

शक्य तितकं स्वतःला हायड्रेटेड ठेवा कारण त्यामुळे तुमच्या त्वचेची आर्द्रता कायम राहील. यासाठी पूर्ण दिवसात १० ते १२ ग्लास पाणी प्या आणि त्यासोबतच तुम्ही ज्यूस, सूप पिऊ शकता ज्यामुळे तुमच्या त्वचेला 'ग्लो' येईल.

या सगळ्या व्यतिरिक्त आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळं यांचा समावेश करा, कारण यामुळे तुमची त्वचा बरीच उजळ, तेजस्वी होईल.

 

Translated by Anyokti Wadekar

loader