सेक्स केल्यावर गुप्तांगातून दुर्गंधी येत असेल, तर ही समस्या असू शकते

स्त्रियांमध्ये सर्वात मोठी समस्या ही असते की त्या प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने सांगू शकत नाहीत आणि ती गोष्ट जर सेक्स करण्याविषयीच्या समस्येशी निगडित असेल तर त्यांना त्याविषयी खूपच लाज वाटते. पण स्त्रिया हे विसरतात की पुढे याचे दुष्परिणाम किती वाईट होऊ शकतात.

आज आपण या गोष्टीविषयी बोलणार आहोत की सेक्स केल्यावर एखाद्या स्त्रीच्या गुप्तांगातून खूप जास्त दुर्गंधी येत असेल तर तिने त्वरित डॉक्टरची भेट घ्यायला हवी.

स्रावांचा गंध

सेक्सच्या दरम्यान जेव्हा स्त्री-पुरुष दोघेही उत्तेजित होतात तेव्हा दोघांच्या घामाने भिजलेल्या शरीरांच्या गंधासोबतच व्हजायनल लूब्रिकेशन, वीर्य आणि लैंगिक स्राव सर्व एकमेकांत मिसळून एक अजब असा गंध दरवळू लागतो. सर्व प्रकारची लूब्स आणि स्पर्मीसाईड्स कस्तुरीसारखा गंध निर्माण करतात.

दोघांच्या गुप्तांगाची दुर्गंधी

संभोगाच्या दरम्यान योनीमधून अॅसिडिक द्रव तर शिस्नातून जो अल्कलाइन द्रव बाहेर पडतो त्यांचा वास एकत्रितपणे एक वेगळाच गंध निर्माण करतो. आणि हा गंध योनिस्राव किंवा वीर्य यांच्या गंधाहून पूर्णपणे वेगळा असतो. संभोगाच्या दरम्यान शरीराची 'पी.एच.' पातळी जी कमी होते त्यावर हा गंध आधारित असतो. आपल्या आहारानुसार देखील शरीराची 'पी.एच.' पातळी कमी होऊ शकते.

रासवट सेक्स

एवढंच काय, काँडमचा वापर केल्यावरही थोडा दुर्गंध तर येतोच. विशेषकरून जेव्हा धसमुसळं, रासवट सेक्स झालं असेल तेव्हा योनीमध्ये घर्षण झाल्याकारणाने सूज येण्याची शक्यता असते. यामुळे एक वेगळाच गंध येतो. हा गंध काँडममध्ये असलेल्या लूब्रिकंटचा सुद्धा असू शकतो.

बॅक्टीरियल इन्फेक्शन

सेक्सच्या दरम्यान येणारा गंध दुर्गंधीत बदलत असेल तर तुम्ही त्वरित जाऊन बॅक्टीरियल इन्फेक्शनची तपासणी करून घेतली पाहिजे. तुमच्या व्हजायनाच्या पी. एच. बॅलन्समुळे एक प्रकारचा ‘बॅक्टीरियल व्हॅजिनोसिस’ निर्माण होतो. याव्यतिरिक्त पुरुषाच्या वीर्यामध्ये जर कुठलं इन्फेक्शन झालं असेल तर त्यामुळे सुद्धा दुर्गंधी येते. व्हजायना मधून जो पांढऱ्या रंगाचा स्राव होतो त्यामुळे सुद्धा दुर्गंधी येऊ लागते.

गुप्तांग स्वच्छ न ठेवण्याची सवय

सहसा लोक शरीराच्या इतर भागांप्रमाणे गुप्तांगाची योग्य प्रकारे स्वच्छता करण्यात फारशी रुची दाखवत नाहीत, ज्यामुळे घाण आणि घामामुळे देखील गुप्तांगातून दुर्गंधी येऊ लागते. म्हणून सेक्स करण्याआधी आणि सेक्स केल्यानंतर गुप्तांग धुवायला विसरू नका. वारंवार वल्वा (Vulva) धुतल्याने इन्फेक्शनची शक्यता कमी होते.

एस.टी.डी

जर सेक्स केल्यावर खूप जास्त दुर्गंधी येत असेल तर हे सेक्शुअली ट्रांसमिटेड डिझीझ 'ट्रायकोमोनियासिस' झाल्याचं लक्षण असतं. म्हणून एस.टी.डी इन्फेक्शन झालंय का, याची तपासणी करून घ्या.

यूरीन इन्फेक्शन

बऱ्याचदा स्त्रियांमध्ये यूरीन इन्फेक्शनमुळे सुद्धा दुर्गंधी येऊ लागते. यूरीन इन्फेक्शनच्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना इन्फेक्शनच्या बाबतीत सहजासहजी कळून येत नाही. जर त्यांनी या काळात आपल्या साथीदारासोबत सेक्स केलं, तर मग दुर्गंधीची समस्या उद्भवू शकते.

स्रोत: hindi.boldsky.com

 

Translated by Anyokti Wadekar

loader