जुन्या सिल्कच्या साड्यांपासून घरासाठी ह्या ६ सुंदर वस्तू बनवा

बऱ्याचदा आपल्या सिल्कच्या साड्या पडून-पडून खराब होतात किंवा मग मधून, विरून फाटू लागतात. अशा वेळी बहुतांश स्त्रिया या साड्यांचा कुर्ता बनवून घालतात. पण या जुन्या साड्यांचे फक्त कुर्तेच बनवले जाऊ शकतात असं नाही, तर त्यापासून तुम्ही घरासाठी काही आवश्यक असं सामान देखील बनवून घेऊ शकता. खाली काही घरगुती वापरातल्या वस्तूंबद्दल सांगितलं गेलं आहे, ज्या तुम्ही अशा प्रकारे बनवून घेऊ शकता. त्या खालीलप्रमाणे आहेत-

उश्या

जर तुमच्याकडे प्लेन बॉर्डरच्या साड्या असतील तर तुम्ही त्यापासून सुंदर अशा उश्या तयार करू शकता. कारण त्या दिसायला खूप छान, आकर्षक दिसतात. याव्यतिरिक्त जर तुम्ही साडीपासून कुर्ता बनवला असेल आणि साडीच्या पदराचं कापड उरलं असेल तर त्याचा तुम्ही अशा प्रकारे वापर करू शकता.

बेड कव्हर

जर तुमच्याकडे उजळ रंगाची एखादी सिल्कची साडी असेल जी तुम्ही आता कधीच नेसणार नसाल, तर त्यापासून अशा प्रकारचं बेड कव्हर तुम्ही बनवून घेऊ शकता. हे दिसायला फारच सुंदर दिसतं.

खिडक्यांचे पडदे

जर तुम्हाला तुमच्या घरात थोडीफार रंगसंगती आणायची असेल तर तुम्ही साडीपासून अशा प्रकारचे पडदे बनवून घेऊ शकता. रंगांची ही उधळण फार शोभून दिसते. अशा प्रकारचे पडदे तुम्ही एखाद्या खास प्रसंगी किंवा पूजेच्या वेळी लावू शकता.

बटवा

जर तुमच्याकडे सिल्कची साडी किंवा त्याचं कापड उरलं असेल तर त्यापासून तुम्ही असे बटवे बनवून घेऊ शकता. हे बटवे कुठल्याही पोशाखावर मॅच होऊ शकतात.

टेबल मॅट्स

जुन्या पडून राहिलेल्या सिल्कच्या साड्यांपासून तुम्ही अशा प्रकारची टेबल मॅट्स बनवून घेऊ शकता. कारण ही दिसायला फार 'क्लासी' दिसतात.

लोड

अशा प्रकारचे लोड बनवण्यासाठी देखील तुम्ही या साड्यांचा वापर करू शकता.

आता तुम्हाला फारसा विचार करायची गरज नाही की जुन्या, पडून राहिलेल्या सिल्कच्या साड्यांचा वापर कसा करावा. वर सांगितलेल्या प्रकारे तुम्ही अशा साड्यांचा वापर करून घर सजवू शकता.

loader