टीव्ही सेलेब्रिटी बेबी व्हिडिओ जे तुम्हाला पूर्ण वीकेण्ड भर पाहात राहावेसे वाटतील

हे सेलेब्रिटी बेबी व्हिडिओ बघून पूर्ण आठवड्याचा ताण झटकून टाका. ही छोटीशी पिंटुकली बाळं जी आपल्या हृदयाच्या तारा झंकारून जातात, त्यांचं वर्णन करण्यासाठी "गोंडस" हा एकमेव शब्द आहे.

इथून निवडले आहे बॉलिवूडशादीज

१. डिम्पी गांगुली ची लहानगी राजकन्या बोलायचा प्रयत्न करत असताना

डिम्पी गांगुली आणि रोहित रॉयची लहानगी येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक एक चार्मिंग यंग लेडी बनत चाललीये. जरा त्या डोळ्यांत पाहा, खोडकरपणा, खट्याळपणा आणि निरागसता यांनी भरलेले आहेत तिचे ते डोळे. तुम्हाला तिला आत्ताच्या आत्ता गोंजारावंसं नाही वाटलं तर ते पाप ठरेल! तिच्या त्या सुंदर डोळ्यांतून तुम्ही जर अजून बाहेर पडला नसाल, तर तिला बोलताना ऐकून तुमचं काय होईल.

हा पाहा तिचा व्हिडिओ:

आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की नाही की व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही तिच्या आणखीनच प्रेमात पडाल?

२. मानसी पारेख ची इवलीशी एंजल जी आईचं सुरेख गाणं ऐकून खिदळतेय

मानसी पारेख आणि पार्थिव गोहिल सारख्या संगीतज्ञ पालकांची छोटुकली निर्वी हिला संगीताचं ज्ञान इतक्या लहान वयातच मिळतंय! जेव्हा जेव्हा तिची लाडकी आई तिला गाणं म्हणून दाखवते, तेव्हा ही लहानगी सुद्धा तिच्या गोड आवाजात गाऊ लागते! अर्थातच, आमच्याकडे ह्याचा पुरावा आहे.

३. शब्बीर आहलुवालिया आणि कांची कौल चे लहानगे आपल्याला मोहकतेने प्रेरित करताना!

हे दोघे लहानगे आपल्या बाबाचं अनुकरण करतायत की आपल्या आईबाबांसोबत पोझ देतायत, काही असलं तरी शब्बीर आणि कांचीच्या ह्या दोन लहान मुलग्यांना पाहणं नेहमीच आनंददायी असतं. हे बच्चे आमचे आवडते आहेत!

हा व्हिडिओ सध्या आम्हाला खासकरून आवडतोय. शब्बीर आणि कांचीचा लहानगा पहिल्यांदा चालताना. किती मोहक दृश्य आहे हे!

.....and HE WALKS !!! #wooohooo #almostone #priceless #ivarr ❤❤❤❤

A post shared by kanchikaul (@kanchikaul) on

आता त्यांच्या मोठ्या मुलाला पाहूया जो फिटनेसचा फारच शौकीन दिसतोय! हा व्हिडिओ पाहून तोंडातून कौतुकाचे उद्गार निघाल्यावाचून राहत नाहीयेत!

Couldnt ask for a better workout partner ?? #fitness #family #love # pure #azai #earlymornings #intense ?

A post shared by Shabir Ahluwalia (@shabirahluwalia) on

आम्ही तुम्हाला सांगितलं होतं हे दोघे पठ्ठे अगदी गोड आहेत!

४. अर्जुन बिजलानीचा मुलगा, त्याला सर्वात जास्त कोण आवडतं हे सांगताना

अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामीचा लहानगा जो हल्लीच २ वर्षांचा झाला तो त्याच्या आई किंवा बाबा बरोबरच्या गंभीर (म्हणजे गोड) बडबडीने आमचं मन दरवेळी जिंकतो. यावेळी डॅडी अर्जुनला एका मोठ्या सवालाचं उत्तर हवं होतं. प्रत्येक बाबासारखं त्यालाही जाणून घ्यायचं होतं की अयानला सर्वात जास्त कोण आवडतं. आणि त्यावर हे आहे अयानचं उत्तर, ह्या क्युटिपाय च्या चेहऱ्यावरचे भाव पाहायला विसरू नका.

Life's bk.#ayaan ❤️❤️

A post shared by Arjun Bijlani (@arjunbijlani) on

५. नेहा नारंग चा मुलगा प्रसिद्ध गाण्यावर नाच करताना

ससुराल गेंदा फूल मधली अभिनेत्री नेहा नारंग दोन वर्षांपूर्वी आई बनली. हल्लीच ह्या सुंदर अभिनेत्रीचा मुलगा दोन वर्षांचा झाला आणि तिने तिच्या ह्या लिटल चॅम्प चे फारच सुंदर फोटो शेअर केले. हे फोटो पाहात असताना, आम्हाला एक खूप गोड व्हिडिओ सापडला जो पुन्हापुन्हा पहावासा वाटतो आणि ज्यामध्ये ह्या इटुकल्याने आपलं नृत्यातलं कौशल्य दाखवलंय.

Translated by Anyokti Wadekar

loader