तजेलदार आणि उजळ त्वचेसाठी रात्री झोपण्याआधी ह्या गोष्टी जरूर करा

प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की तिची त्वचा डागविरहित आणि उजळ असावी. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, फक्त रात्री झोपण्याआधी काही गोष्टी करायच्या आहेत. कारण रात्रीची वेळ ही तुमच्या त्वचेच्या हानी पोहोचलेल्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी योग्य वेळ असते. तर मग जाणून घेऊया की त्वचेची काळजी घेण्यासाठी व तिची दुरुस्ती करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तजेलदार आणि निरोगी त्वचा लाभू शकेल.

१. नेहमी आठवणीने मेकअप काढा

आपल्या त्वचेची देखभाल करण्याचा हा एक साधा पण आवश्यक मार्ग आहे, असे न केल्यास त्वचेला हानी पोहोचू शकते. रात्री झोपण्याआधी त्वचेवरून मेकअप चांगल्या प्रकारे काढून घेतला पाहिजे जेणेकरून त्वचेची छिद्रं मोकळी होतील आणि श्वास घेऊ शकतील. यामुळे इन्फेक्शनचा फैलाव होत नाही.

२. आपल्या त्वचेला स्वच्छ आणि शुद्ध ठेवा

मेकअप काढल्यावर तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करणं गरजेचं असतं. त्वचेच्या प्रकारानुसार एक चांगला क्लीन्जर विकत घ्या आणि त्याचा वापर करून मेकअप काढा. क्लीन्जरमुळे त्वचेवरची सर्व घाण आणि तेल निघून त्वचेची छिद्रं अगदी खोलवर स्वच्छ होतात.

३. त्वचेला मॉईश्चराइझ करायला विसरू नका

त्वचेची देखभाल करण्यासाठी हा एक आवश्यक उपाय आहे. हा उपाय प्रत्येकाने अवलंबला पाहिजे. रात्री त्वचेला मॉईश्चराइझ करणं, हायड्रेटेड करणं गरजेचं आहे. ज्यामुळे त्वचेच्या हानी पोहोचलेल्या पेशींची दुरुस्ती होण्यात मदत होते. यासाठी झोपण्याअगोदर त्वचेला मॉईश्चराइझ करायला विसरू नका, यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल.

४. डोळ्यांखालच्या त्वचेवर क्रीम लावा

तुमच्या डोळ्यांखालची त्वचा सर्वात पातळ आणि नाजूक असते त्यामुळे तिची अतिरिक्त देखभाल करणं आवश्यक ठरतं. रात्री झोपण्याआधी डोळ्यांखाली क्रीम लावा ज्यामुळे डोळ्यांखालचे फुगवटे आणि काळी वर्तुळं कमी होण्यात मदत होईल.

५. फेस मास्कचा वापर देखील करू शकता

तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपल्या त्वचेनुसार चेहऱ्यावर फेस मास्क देखील लावू शकता. त्वचेच्या देखभालीच्या ह्या उपायामुळे तुमची त्वचा सुगंधित आणि सुंदर होण्यात मदत होईल.

६. चांगली झोप घ्या

सुंदर त्वचा मिळवण्यासाठीचा हा एक आवश्यक उपाय आहे. तुम्ही नेहमी ७ ते ९ तास झोपण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच आरोग्यपूर्ण आहार तुमच्या त्वचेचं सौंदर्य कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो

 

Translated by Anyokti Wadekar

loader