गरोदरपणात जरूर करा ही ५ कामं, हे फायदे होतील

गर्भावस्थेच्या दरम्यान प्रत्येक स्त्रीच्या मूडमध्ये बदल झालेला दिसून येतो, ज्यामुळे कधी तुम्हाला खूप छान वाटतं तर कधी अगदी वाईट. पण बऱ्याचदा, स्त्रिया या दिवसांत ताणतणावात असतात. मग कंबरदुखी असो, लघवीची समस्या किंवा मग रात्री झोप न लागण्याची समस्या असो. पण, जर तुम्ही ठरवलंत तर तुम्ही या दिवसांतही खूश राहू शकता, त्यासाठी तुम्हाला फक्त अशी काही कामं करावी लागतील जेणेकरून तुम्ही या दिवसांत खूश राहू शकाल, ही कामं खालीलप्रमाणे आहेत-

नेहमी अॅक्टिव्ह राहा

या दिवसांत तुम्ही जेवढं अॅक्टिव्ह राहाल तेवढंच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण यामुळे नुसताच तुमच्या मूडमध्ये बदलाव येणार नाही तर हे तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी देखील फायदेशीर राहील. याव्यतिरिक्त तुम्ही व्यायाम केला पाहिजे कारण व्यायामामुळे गर्भावस्थेच्या दरम्यानचा तणाव कमी होतोच पण त्याबरोबरच मांसपेशी देखील मजबूत होतात. एवढंच नाही तर व्यायामामुळे तुमचं वाढतं वजन देखील काबूत राहतं. यासाठी स्वतःला काही कामामध्ये गुंतवून ठेवा, ज्यामुळे तुमच्या डोक्यात भलतेच विचारही येणार नाहीत.

स्वतःसाठी वेळ काढा

काही स्त्रियांना असं वाटतं की बाळ झाल्यावर त्यांचं स्वतःचं जगच संपून जातं. पण असं नाही आहे, तुम्ही बाळ झाल्यावरही स्वतःला सांभाळू शकता, आणि यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःसाठी वेळ काढा. यासाठी तुम्ही पेडीक्योर, मॅनिक्योर, फुल बॉडी मसाज, नवीन हेअरकट इत्यादी करावं. त्यामुळे तुम्हाला खूप छान आणि वेगळं वाटेल.

मेकअप कडे देखील लक्ष द्या

या दिवसांतही तुम्ही तुमच्या मेकअप कडे खास लक्ष द्या कारण त्यामुळे तुम्हाला बरंच छान फील होईल. स्त्रियांना सुंदर दिसणं सर्वात अधिक आवडतं, म्हणून या दिवसांतही तुम्ही पहिल्याप्रमाणेच स्वतःची काळजी घ्या. तसंच, या दिवसांत हार्मोन्समध्ये परिवर्तन झाल्यामुळे तुमचा चेहरा थोडा सुस्तावल्यासारखा दिसू शकतो, म्हणून त्यावर तजेला आणण्याचं काम करा.

केसांना एक नवीन लुक द्या

या दिवसांत तुम्ही तोकडी हेअर स्टाईल करून घेऊ शकता. कारण या दिवसांत तोकडे केस सहजगत्या हाताळले जाऊ शकतात.

मॅटरनिटी ड्रेस

जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुमच्या पोटाचा आणि शरीराचा आकार वाढू लागतो, ज्यामुळे कुठलेच कपडे तुम्हाला फिट होत नाहीत. अशा वेळी, ही योग्य वेळ आहे, जेव्हा तुम्ही मॅटरनिटी-कपडे विकत घ्यायला हवेत. असं असलं तरी, जेव्हा कधी तुम्ही याप्रकारचा ड्रेस घालत असाल तेव्हा कॉटनचे सैलसर कपडे घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला आरामदायक वाटेल.

या सगळ्याव्यतिरिक्त आपल्या आहाराकडेही योग्य प्रकारे लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही एका निरोगी बाळाला जन्म देऊ शकाल.

 

Translated by Anyokti Wadekar

loader