आपल्या मुलीबरोबर या गोष्टीची चर्चा करायला आया भितात. नाही, ती गोष्ट म्हणजे सेक्स नाही!

कधी कधी सर्वात जास्त कठीण गोष्ट ही असते की आपण जसे आहोत तसं जगाला सामोरं जाणं. ज्या प्रश्नाची प्रत्येक आईला भीती वाटते (कारण तो तिच्या बाबतीत देखील विचारला गेलेला असतो) तो प्रश्न भारतातल्या प्रत्येक लहान मुलीच्या बाबतीत विचारला जातो.

"ती सुंदर आहे का? "

तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाचं विश्लेषण केलं जातं आणि सौन्दर्याच्या मापदंडावर तिचं शरीर खरं उतरतं का ह्याची छाननी केली जाते. गूगल वर "माझी मुलगी जाड आहे" यावर किती हिट्स मिळालेत ते पाहा. 

सौन्दर्य म्हणजे काय? सुंदर कशाला म्हणतात? त्याची काही व्याख्या आहे का? सौन्दर्य कुठे मिळतं? ते दुकानातून विकत घेता किंवा बनवता येतं का? ती जशी आहे तशी सुंदर आहे हे तुम्ही तुमच्या मुलीला कसं सांगू शकता? तिच्यातली कोणतीही गोष्ट न बदलता? 

१. "आई, मी जाड आहे का?"

जाडेपणावरून सगळीकडे नालस्ती होत असताना तुमच्या मुलीला ही नकारात्मकता दूर ठेवायला सांगणं खूप कठीण आहे. शाळेत, तुमच्या समाजात, लग्नसमारंभात, इतर सोहळ्यात लहान मुलांच्या शरीरावर टिप्पणी करणं खूपच निर्दयी आहे. 

Fat shaming is a social menace. Stop it before it stops your child from achieving her potential.
जाडेपणावरून लज्जित करणं ही सामाजिक समस्या आहे.  तुमच्या मुलीच्या समर्थ होण्यात त्याचा अडथळा येण्याआधीच ते थांबवा.  

काय करावं: अशा कॉमेंट्स वरचा तुमचा राग जाहीर करा. ज्या स्त्री किंवा पुरुषाने तुमच्या मुलीच्या मनात तिच्या शरीराविषयायी नकारात्मक प्रतिमा तयार केली - ज्याचे तुमच्या मुलीच्या स्वाभिमानावर दूरगामी वाईट परिणाम होतील, त्या स्त्री किंवा पुरुषाला त्याचा जाब विचारा. 

तुमच्या मुलीला हे सांगा: वादविवादामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा निवडता ते महत्वाचं आहे. आरडाओरडा किंवा भांडण करू नका. त्यामुळे सगळाच मोठा तमाशा होऊन बसतो. "तुम्ही जे बोललात ते मला आवडलं नाही" किंवा "दुखावणाऱ्या कॉमेंट्स करणं सच्चेपणाचं नाही, तर उलट त्याच्या विरुद्ध आहे. कारण सत्य हे आहे की ती सुंदर आहे". अशा बोलण्याने जेव्हा तुमच्या मुलीवर स्वतःहून अशा लोकांना प्रत्युत्तर द्यायची वेळ येईल तेव्हा तिला माहीत असेल की कोणते शब्द वापरायचे. 

२. "आई, मी खरंच काळी आहे का?' 

जेव्हा भारतीयांना कळेल की सावळी त्वचा ही सुंदर असते तेव्हा प्रथमच भारतातील ५०% स्त्रियांचा आत्मविश्वास वाढेल. 


त्वचेचा सावळा रंग म्हणजे जे आहे ते आहे. काही चांगलंही नाही. काही वाईटही नाही. जसं आहे तसं. 

काय करावं: ज्या नामवंत सेलेब्रिटी ह्या लांछनाच्या विरोधात उभ्या ठाकल्या त्यांचे फोटो तुमच्या मुलीला दाखवा. उदाहरणार्थ - सोनम कपूर. विश्वास बसत नाही? मग हे वाचा. 

तुमच्या मुलीला सांगा: भारतात एक सावळ्या त्वचेची मुलगी असण्याचे फायदे. मेलॅनिन मुळे व्हिटॅमिन डी शरीरात जास्त चांगल्या प्रकारे शोषलं जातं. 

३. "मी माझ्या तोकड्या केसांमुळे मुलग्यांसारखी दिसते का?"


मुलींना तोकडे केस छान शोभून दिसू शकतात!

केस हा आणखी एक असा विषय आहे ज्यावरून लहान मुलांवर टिप्पणी केली जाते. जर एखाद्या मुलीचे केस तोकडे असतील तर त्या खोलीतली ४० वर्षे वयावरची प्रत्येक व्यक्ती आपली जणू जबाबदारी असल्यासारखी विचारते की तुमची मुलगी मुलग्यासारखी का दिसते?

काय करावं: तिला आपल्या स्वतःच्या निवडीला महत्त्व द्यायला शिकवा. तिला हे सांगा की कशा प्रकारचे कपडे परिधान केले जातात ह्यावरून मुलामुलींचं वेगळेपण ठरत नाही. तिचा आत्मविश्वास ढासळवू पाहणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या लोकांसमोर कधीही न झुकण्याचं तिला शिकवा. 

तुमच्या मुलीला सांगा: तिला हा तर्क समजावून सांगा: म्हणजे मग जीन्स घालणाऱ्या सगळ्या मुली ह्या मुलगे आहेत का? तिला सांगा की 'वॉलेट' चा जन्म झाला कारण स्त्रिया 'बटवा' वापरत असत. मग त्याचा अर्थ असा होतो का की सगळे पुरुष जे वॉलेट वापरतात ते स्त्री आहेत? 

४. "मी शॉर्ट्स मध्ये चांगली दिसत नाही ना?"

पाश्चात्य कपडे हा टिप्पणी करण्यासाठी म्हणून लोकांचा आणखी एक आवडता विषय आहे. आपण ठेंगण्या आणि घाटदार शरीराच्या असतो या गोष्टीने आपल्याला एकमेवाद्वितीय बनवलं पाहिजे. या गोष्टीने आपल्याला लोकांच्या दादागिरीचे बळी बनवता कामा नये. 

काय करावं: तिला स्वतःकडे पाहायला सांगा आणि हे बघायला सांगा की ती किती सुंदर आहे. ती सुंदर आहे ह्यावर तुम्ही स्वतःदेखील मनापासून विश्वास ठेवा. उगाचच व्यर्थ बाष्कळ असं काही बडबडू नका. 

तिला सांगा: तिला जेव्हा आतून चांगलं वाटतं तेव्हा ती बाहेरूनही छान दिसते. स्वतःचं म्हणणं उदाहरणाने पटवून द्या आणि तुम्ही सुद्धा पाश्चात्य कपडे घाला. 

५. "मला माहितीय मी सुंदर नाही"

काय करावं: इतर कुठल्याही मुलीची खूप जास्त स्तुती करू नका. सौन्दर्याविषयीच्या बेजबाबदार संभाषणांना प्रोत्साहन देऊ नका. 

तिला सांगा: तुमच्यासाठी आणि तिच्या जवळच्या १० व्यक्तींसाठी ती म्हणजे पूर्ण जग आहे. आणि हेच खरं सौन्दर्य आहे. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे फसवणूक आहे.

Translated by Anyokti Wadekar

loader