जुन्या सिल्कच्या किंवा बनारसी साड्यांपासून बनवा हे ६ उत्तम, स्टायलिश कपडे

एकाच प्रकारचे कपडे घालून घालून मग कधीतरी त्याचा कंटाळा येऊ लागतो यात शंकाच नाही. खासकरून, जर सिल्क किंवा बनारसी साड्यांबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही त्या जास्तीत जास्त ५ वेळा नेसत असाल, त्यानंतर त्या तुम्हाला नेसाव्याश्या वाटत नाहीत. मग अशा साड्या म्हणजे एक डोकेदुखी बनून जाते. पण, काळजी करू नका, खाली काही अशा स्टायलिश डिझाईन्स सांगितल्या गेल्या आहेत ज्या तुम्ही सिल्कच्या साड्यांपासून बनवू शकता. या डिझाईन्स खालील प्रमाणे आहेत-

जॅकेट स्टाईल

हल्ली अशा प्रकारची जॅकेट्स खूप फॅशनेबल झाली आहेत, जी तुम्ही सहजच केव्हाही घालू शकता. जर तुमची सिल्कची साडी पडून राहून खराब होत असेल, तर तुम्ही त्या साडीपासून असं सुंदर आणि स्मार्ट जॅकेट बनवून घेऊ शकता.

सुंदर अनारकली सूट

तुमच्या जुन्या सिल्क आणि बनारसी साड्यांचा पुन्हा जर काही प्रकारे वापर होऊ शकत असेल तर तो म्हणजे अनारकली सूट शिवून. कारण यात संपूर्ण साडीचा चांगल्या प्रकारे वापर होतो. तुम्ही पाहू शकता की या अनारकली सूट मध्ये कसा साडीच्या पदरापासून वरचा ब्लाऊज बनवला गेलाय.

भरजरी ओढणी

जर तुमची साडी खूप भरजरी आणि एकाच रंगाची असेल तर तुम्ही त्यापासून एक पूर्ण पोशाख न बनवता त्यापासून ओढणी बनवू शकता. ही ओढणी तुम्ही कोणत्याही सिम्पल अशा सूट वर घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला एक छान ‘लुक’ प्राप्त होईल.

स्कर्ट

जर तुमची सिल्कची साडी खूप भरजरी असेल तर तुम्ही त्याचा स्कर्ट बनवून घेऊन त्यावर घालण्यासाठी एखादा स्टायलिश टॉप बनवून घेऊ शकता. पण हे लक्षात ठेवा की टॉप सुद्धा खूप भरजरी असता कामा नये, साधा प्लेन टॉप जास्त चांगला दिसेल.

पलाझो

सिल्क आणि बनारसी कापडाचे पलाझो दिसायला फारच छान दिसतात. तर मग तुम्ही साड्यांपासून पलाझो आणि ट्राऊझर्स बनवून घेऊन घालू शकता, ज्यामुळे तुम्हाला एक 'कूल' लुक मिळेल.

लेहेंगा

 

जर तुम्ही सिल्कच्या भरजरी साड्या नेसून कंटाळला असाल तर त्या साड्यांपासून तुम्ही असे सुंदर लेहेंगे देखील बनवू शकता. हे लेहेंगे तुम्ही पार्टी किंवा इतर कुठल्याही सोहळ्यात घालू शकता, ज्यामुळे तुम्हाला एक 'रिच' असा लुक मिळेल.

 

Translated by Anyokti Wadekar

loader