तर मग या ५ कारणांमुळे स्त्रियांच्या गुप्तांगात येते सर्वाधिक खाज

स्त्रियांच्या गुप्तांगामध्ये खाजेची समस्या बरीच सर्वसाधारण आहे पण ही समस्या गंभीर रूप तेव्हा धारण करते जेव्हा स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात. कारण जोपर्यंत हा त्रास आणखी वाढत नाही तोपर्यंत स्त्रिया याबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत. परंतु कुठल्याही स्त्रीने अशा प्रकारची समस्या झाल्यावर आपल्या डॉक्टरशी मोकळेपणाने बोललं पाहिजे जेणेकरून डॉक्टर योग्य प्रकारे इलाज करू शकेल.

योनी मध्ये खाजेचं कारण काय आहे?

सर्वसाधारणतः स्त्रियांमध्ये अशा प्रकारची समस्या यीस्ट इंफेक्शन मुळे सुद्धा उत्पन्न होते ज्यामध्ये स्त्रियांच्या योनीमध्ये खाज, जळजळ आणि काही द्रवपदार्थ यासारखी लक्षणं दिसून येतात. स्त्रियांमध्ये ही समस्या खूपच सर्वसाधारण आहे, १०० पैकी ८० स्त्रियांना या इंफेक्शनचा सामना करावा लागतो. कदाचित तुम्हाला माहीत असेल की हे इंफेक्शन कँडिडा अॅल्बिकंस नामक जीवाणू मुळे होतं.

तरी, याची लक्षणं तुमच्यामध्ये अशा प्रकारे दिसून येऊ शकतात, जी खाली दिली आहेत-

योनी मध्ये खाज - यीस्ट इंफेक्शनचं सर्वात पहिलं लक्षण योनी मध्ये गंभीर स्वरूपाच्या खाजेसह जळजळ हे आहे.

योनिस्राव - याव्यतिरिक्त सर्वसाधारणतः योनी मधून पांढऱ्या रंगाचा, जाडसर, गुठळ्यागुठळ्यांचा आणि बिनवासाचा योनिस्राव होणं.

योनी मध्ये वेदना - लघवी करताना वेदना आणि त्वचेमध्ये जळजळ जाणवणं.

योनीचं लाल होणं - योनीच्या आसपास आणि आत लालसर होणं आणि त्वचा त्रासणं.

संभोगाच्या दरम्यान वेदना - यीस्ट इंफेक्शनच्या लक्षणांमध्ये एक लक्षण हेही आहे की संभोगाच्या दरम्यान स्त्रीच्या योनी मध्ये वेदना होणं.

या सर्वांव्यतिरिक्तसुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या अशा प्रकारची समस्या वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात, ज्या खाली दिल्या आहेत -

यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे कमजोर रोगप्रतिकार प्रणाली होय. त्याव्यतिरिक्त जर तुम्हाला मधुमेहाचा आजार असेल तर हे इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यासोबतच हॉर्मोन्सची असमानता हेसुद्धा एक मोठं कारण आहे जे तुमच्यामध्ये अशा प्रकारची समस्या उत्पन्न करतं. म्हणून, अशा प्रकारची समस्या उत्पन्न होताच त्वरित डॉक्टरला संपर्क करा.

सुगंधित पदार्थ आणि लूब्रिकंट्स

काही स्त्रिया या इंफेक्शनच्या खाज आणि वासापासून सुटका मिळवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे सुगंधित पदार्थ आणि लूब्रिकंट्सचा वापर करतात, ज्यामुळे ही समस्या आणखीनच वाढते. कारण या पदार्थांमध्ये केमिकल्स असतात जी तुमचा त्रास आणखी वाढवतात.

चुकीच्या पद्धतीने संभोग करणं

काही स्त्रिया चुकीच्या पद्धतीने संभोग करतात ज्यामुळे त्यांच्यात खाजेची समस्या उत्पन्न होते. किंवा मग कोरडेपणामुळे सुद्धा खाज येते.

चुकीच्या अंतर्वस्त्रांची निवड

काही स्त्रिया फॅशनच्या नादात चुकीच्या अंतर्वस्त्रांची निवड करतात ज्यामुळे देखील खाज आणि जळजळ उत्पन्न होते. म्हणून नेहमी सुती आणि सैल कपडे वापरावेत.

यापासून वाचण्यासाठी काय उपाय करावेत?

आपलं गुप्तांग नेहमी स्वच्छ आणि कोरडं ठेवा.

सुती अंतर्वस्त्र घाला आणि तीसुद्धा स्वच्छ.

खोबरेल तेलाने योनी मधील खाजेपासून आराम मिळतो.

अॅलर्जी रिअॅक्‍शन मुळे देखील त्रास होऊ शकतो. कोणतंही तीव्र वासाचं परफ्यूम, लोशन किंवा साबण वापरू नका.

या सगळ्या व्यतिरिक्त आपल्या आहाराकडेही लक्ष द्या जेणेकरून तुमची याप्रकारच्या समस्येपासून सुटका होईल.

 

Translated by Anyokti Wadekar

loader