व्हजायना बद्दलच्या आश्चर्यकारक गोष्टी ज्या तुम्हाला कधीच माहीत नव्हत्या!

तुम्हाला माहितीय ‘ति’च्यातून रक्तस्राव होतो, तुम्हाला माहितीय ‘ति’च्यातून एक मानवी अर्भक बाहेर पडू शकतं आणि तुम्हाला हेही माहितीय की सेक्सच्या दरम्यान ‘ति’च्यामुळे तुम्ही विव्हळू लागता! पण थांबा! व्हजायना विषयी काही ठरावीक गोष्टी आहेत ज्या आम्ही पैजेवर सांगू शकतो, की तुम्हाला माहीत नव्हत्या.

संभोग आणि प्रजननामध्ये व्हजायना महत्वाची भूमिका बजावते, हे सर्वांना माहीत असतं, पण तिच्याविषयीच्या इतर सगळ्या गोष्टी बऱ्याच लोकांसाठी एक रहस्यच असतात. ह्या 'सिक्रेट स्पॉट' विषयीच्या ह्या ५ गोष्टी प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला माहीत असल्याच पाहिजेत.   

१. तुम्ही तुमची व्हजायना पाहू शकत नाही

पहिली गोष्ट म्हणजे, बरेच लोक स्त्रीच्या जननेंद्रियाला 'व्हजायना' म्हणतात. पण तुम्ही प्रत्यक्षात जे पाहात असता (वैद्यकीय भाषेत जेनिटेलिया) त्याला 'वल्वा' म्हणतात. व्हजायना ही (३/४ इंच रुंद आणि २-४ इंच लांब) नळी असते जी व्हजायनाच्या प्रवेशद्वाराला गर्भाशयग्रीवेशी (सर्व्हिक्स शी) जोडते. तुम्ही बसलात, उभे राहिलात किंवा खाली झोपलात तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हजायनाला पाहूच शकत नाही!

२. व्हजायना हा सर्वात जास्त स्नायू असलेला अवयव आहे

व्हजायनाचं प्रवेशद्वार आणि व्हजायना हे स्त्रीच्या शरीरातले सर्वात जास्त स्नायू असलेले अवयव आहेत. ह्या कारणामुळेच संभोगाच्या आणि प्रसूतीच्या वेळी तुमची व्हजायना प्रसरण किंवा आकुंचन पावू शकते. आश्चर्य म्हणजे, संभोगादरम्यान व्हजायना १० ते २० सेंटीमीटर एवढी लांबीमध्ये आणि २.५ इंच एवढी रुंदीमध्ये प्रसरण पावू शकते. आता कळलं तुम्हाला, की तुमचं मूल 'एवढ्या लहान' छिद्रातून कसं बाहेर आलं?

३. सर्व स्त्रियांना 'हायमेन' नसतं

अनेकदा ज्याचा संबंध कौमार्याशी जोडला जातो, ते 'हायमेन' म्हणजे व्हजायनाच्या प्रवेशद्वारी असलेला, ऊतींनी बनलेला पडद्यासारखा एक भाग असतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज असला की हायमेनचं फाटणं म्हणजे कौमार्याचा भंग होणं, तरी ह्यातला विरोधाभास म्हणजे बहुतांशी स्त्रियांमध्ये हे हायमेन नसतंच. आणि ज्या स्त्रियांना हे हायमेन असतं, ते खडतर शारीरिक श्रमाच्या वेळी किंवा हार्मोन्सच्या चढउतारादरम्यान वगैरे फाटून निघून गेलेलं असण्याची शक्यता असते. म्हणून लक्षात ठेवा, की हायमेन शाबूत असणं, पहिल्यांदा सेक्स करताना रक्तस्राव होणं किंवा हायमेनच्या संदर्भातले इतर सगळे समज हे व्यक्तिनिष्ठ असतात आणि ते 'प्रत्येक स्त्री' च्या बाबतीत खरे नसतात.

४. जी-स्पॉट अस्तित्वात आहे!

होय हे खरंय! जी-स्पॉट हा व्हजायनाच्या प्रवेशद्वाराजवळचा एक भाग आहे आणि तो स्त्रियांना अपरिमित सुख देऊ शकतो. ह्या भागामध्ये भरपूर मज्जातंतूंची टोकं असतात, ज्यांच्यामुळे तुम्ही संभोगाच्या दरम्यान सुख अनावर होऊन विव्हळू लागता. म्हणून, तुम्हाला जर असं वाटत असेल की जी-स्पॉट ही एक काल्पनिक गोष्ट आहे, तर तसं अजिबात नाहीये!

५. स्त्रियांमध्ये जात्याच लूब्रिकंट्स असतात

हो, तुम्ही वाचलं ते बरोबर आहे! फक्त तुमचीच लूब्रिकंट्स तुम्हाला उत्तम रतिसुख मिळवून देतात असं नाही. स्त्रियांमध्ये बार्थोलिन्स ग्लॅण्ड्स नावाच्या विशिष्ट ग्रंथी असतात, ज्यांच्यामुळे उत्तेजित झाल्यावर व्हजायना ओलसर राहाते. म्हणून स्त्रियांनो, जर तुमचं लूब्रिकेशन होत नसेल, तर डॉक्टरकडे जाऊन त्यांना ह्या समस्येविषयी सांगा.

फीचर इमेज स्रोत: सेव्हन्टीन डॉट कॉम

Translated by Anyokti Wadekar

loader