थंडीच्या मोसमात बाळाची मालिश या तेलाने करावी, बाळाला ऊब मिळेल

केवळ थंडीच्या मोसमातच नव्हे तर इतर ऋतूंमध्ये देखील बाळाच्या मालिशची नीट व्यवस्था केली पाहिजे. कारण ज्याप्रकारे बाळासाठी स्तनपान महत्त्वाचं असतं, त्याच प्रकारे मालिशसुद्धा महत्त्वाची मानली जाते. कारण मालिशमुळे बाळाच्या मांसपेशी बळकट होतात. थंडीच्या दिवसांत मालिश केल्यामुळे बाळाच्या शरीराला ऊब मिळते. खाली काही अशा तेलांबद्दल सांगितलं गेलं आहे, जी थंडीच्या दिवसांत मालिशसाठी चांगली मानली जातात.

राईचं तेल

थंडीच्या दिवसांत राईचं तेल सर्वात चांगलं मानलं जातं. हवं तर या तेलात जायफळ टाकून थोडं कोमट करून मग लावा. यामुळे केवळ बाळाची हाडंच मजबूत होतात असं नाही तर त्यांच्या शरीराला आतून ऊब मिळते. तुम्ही पाहिलं असेल की राईच्या तेलाचा वापर सहसा उन्हाळ्यात केला जात नाही.

बदामाचं तेल

बदामाचं तेल देखील थंडीच्या मोसमात चांगलं मानलं जातं. यामुळे बाळाला ताकद मिळते आणि बाळाची त्वचा देखील उजळ होते. म्हणून तुम्ही ह्या तेलाने बाळाची रात्री मालिश करा.

खोबरेल तेल

आजकाल लोक हे तेल लावणं जास्त पसंत करतात कारण यामुळे त्वचा रुक्ष होत नाही आणि कोंड्याची समस्या सुद्धा होत नाही. म्हणून थंडीच्या दिवसांत बाळाची या तेलाने मालिश करा.

ऑलिव्ह ऑईल

सहसा तुम्ही हे पाहिलं असेल की आई सुरुवातीपासूनच बाळाला हे तेल लावत असते कारण त्यामुळे त्वचा उजळ होते. तसंच, हे तेल लावल्याने शरीरात कुठ्ल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही.

मालिश करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

नवजात बाळाला मालिश करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे-

खूप भरभर किंवा खूप जोर लावून मालिश करू नका

जेव्हा केव्हा तुम्ही बाळाची मालिश करत असाल तेव्हा याकडे नक्की लक्ष द्या की बाळाच्या शरीरावर अतिरिक्त दबाव टाकू नका. कारण त्यामुळे बाळाला इजा होऊ शकते आणि त्याच्या मांसपेशींवर अतिरिक्त दबाव पडू शकतो. बाळाची मालिश हलक्या हाताने करावी.

डोळ्यांमध्ये तेल जाणार नाही याची काळजी घ्या

बाजारात विकत मिळणाऱ्या हर्बल तेलाचे बरेच घटक उष्ण स्वरूपाचे असतात, आणि या घटकांचा बाळाच्या डोळ्यांशी संपर्क आल्यास बाळाच्या डोळ्यांत जळजळ होऊ शकते. म्हणून बाळाच्या डोळ्यांत तेल जाणार नाही याकडे लक्ष द्या.

मालिश नंतर लगेचच आंघोळ घालू नका

बाळाची मालिश झाल्यानंतर त्याला लगेचच आंघोळ घालू नका. १० ते १५ मिनिटे बाळाला खेळायला सोडून द्या. मग बाळाला आंघोळ घाला. याशिवाय आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाळाला आंघोळ घालण्यासाठी फक्त कोमट पाण्याचाच वापर करा. कोमट पाण्यामुळे बाळाच्या त्वचेवर तेल मागे राहात नाही.

मालिश मुळे बाळाला खूप शांत आणि आरामदायक वाटतं. नवजात बाळाला दिवसातून कमीत कमी चार ते पाच वेळा मालिश जरूर करावी. यामुळे बाळाच्या मांसपेशी मजबूत होतील

 

Translated by Anyokti Wadekar

loader