हिवाळ्यात, तेलात हे ५ पदार्थ मिसळून केसांना जरूर लावा, केस गळायचे थांबतील

हिवाळ्यात केस गळण्याची समस्या ही खूप सर्वसाधारण आहे, कारण या दिवसांत कोंड्याचा त्रास फार होतो आणि त्यामुळे केस गळू लागतात. परंतु, काही असे घरगुती उपचार आहेत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही या समस्येपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. हे उपाय खालील प्रमाणे आहेत-

खोबरेल तेल आणि अंडं

 

खोबरेल तेल केसांसाठी खूपच फायदेशीर मानलं जातं कारण हे तुमच्या केसांना योग्य ते पोषण देण्याचं काम करतं. पण तुम्ही हे तेल त्यामध्ये अंडं मिसळून आणखी गुणकारी बनवू शकता. यासाठी एक अंडं चांगल्या प्रकारे फेटून घेऊन त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळून केसांना व्यवस्थित लावून घ्या आणि मग अर्ध्या तासाने शॅम्पूने धुवून टाका.

खोबरेल तेल आणि लिंबू

हिवाळ्यात बऱ्याचदा केसांत कोंड्याची समस्या उद्भवते. तुम्हाला खरंच या समस्येपासून मुक्ती हवी असेल तर त्यासाठी खोबरेल तेलात काही थेंब लिंबाचा रस टाकून केसांना लावा. हे मिश्रण केसांना रात्री लावून सकाळी धुवू शकता. त्यामुळे ते तुमच्या स्कॅल्प मध्ये चांगलं मुरेल. अधिक चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून ३ वेळा हे मिश्रण केसांना लावा.

ऑलिव्ह ऑईल आणि कोरफड

केसांची सततची गळती थांबवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल थोडं कोमट करून घेऊन त्यामध्ये कोरफडीचा गर (अॅलोवेरा जेल) नीट मिसळून घ्या. मग हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. त्यानंतर डोक्यावर एक सुती कपडा गुंडाळून ठेवा. आणि मग साधारण एक तासाने केस धुवा. तुमचे केस सुंदर आणि चमकदार होतील.

राईचं तेल आणि दही

 

जर तुमचे केस रुक्ष आणि निर्जीव झाले असतील तर त्यासाठी हे मिश्रण खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही दह्यामध्ये राईचं तेल मिसळून केसांना व्यवस्थित लावून घ्या आणि मग एक तासाने धुवून टाका. केस धुतल्यावर केसांना एक वेगळीच चमक आल्याचं दिसून येईल.

खोबरेल तेल आणि आवळा

रुक्ष आणि गळणाऱ्या केसांसाठी आवळा म्हणजे जणू वरदानच. कोमट खोबरेल तेलात किसलेला आवळा टाकून अर्ध्या तासासाठी तसाच ठेवून द्या. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावून, एक ते दोन तास ठेवा. मग धुवून टाका.

या सगळ्या व्यतिरिक्त, तुम्ही खोबरेल तेलात कापूर घालूनही केसांना लावू शकता. यामुळे केसांत कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन होत नाही आणि त्यासोबतच कोंड्याची समस्या दूर होते.

 

Translated by Anyokti Wadekar

loader