आठवड्याभरात तुमचं ब्रेस्टमिल्क वाढेल, फक्त या ५ गोष्टी ध्यानात ठेवा

काही स्त्रियांमध्ये बाळाच्या जन्मानंतर दूध न येण्याची समस्या उद्भवते, त्यांच्या स्तनांतून दूध यायला खूप वेळ लागतो. किंवा मग काही स्त्रियांमध्ये ब्रेस्टमिल्कचं उत्पादन चांगल्या प्रकारे होत नाही, ज्यामुळे बाळाला उपाशी राहावं लागतं. पण अशा वेळी बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळालं नाही, तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. कारण या वेळी नवजात बाळ पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असतं.

खाली काही उत्तम उपाय सांगितले गेले आहेत, ज्यांच्या आधारे आठवड्याभरात दूध बनायला सुरुवात होते, हे उपाय खालील प्रमाणे आहेत-

मेथीचे दाणे

आईचं स्तनांतून येणारं दूध वाढवण्याची बात येते तेव्हा मेथीचे दाणे खूप महत्त्वाचे मानले जातात. या दाण्यांचा वापर आजी-पणजीच्या काळापासून होत आला आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ असतं, ज्यामुळे दुधात वाढ व्हायला मदत होते. एवढंच नाही तर यामध्ये बीटाकॅरोटीन, बी व्हिटॅमिन, आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने हे बाळाच्या मेंदूसाठी देखील महत्त्वपूर्ण मानले जातात.  

मसूर डाळ

मसूर डाळ दूध वाढवण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत मानला जातो. त्यासोबत यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि फायबर असल्याने दूध निर्माण होण्यात मदत होते.

स्तन आलटून पालटून स्तनपान द्या

काही स्त्रिया अशा असतात ज्या एकाच स्तनाने बाळाला स्तनपान देतात, जी योग्य पद्धत नाही. कारण जेव्हा तुम्ही आलटून पालटून दोन्ही स्तनांनी स्तनपान देता तेव्हा त्यामुळे शरीरात दुधाचं उत्पादन वाढतं. तसंच, असं केल्याने बाळाला देखील आरामात दूध पिता येईल. या पद्धतीमुळे दोन्ही स्तन रिते होत जातील आणि दुधाचं उत्पादन वाढेल. एका वेळी स्तनपान करताना कमीत कमी दोन ते तीन वेळा आलटून पालटून स्तन निवडा.

दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ

तुम्ही सहसा हे बघितलं असेल की प्रसूतीनंतर स्त्रियांना दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण या पदार्थांपासून शरीराला अशा प्रकारचे फॅट्स मिळतात, जे तूप, लोणी किंवा तेलापासून मिळतात, जे ब्रेस्टमिल्क वाढवण्यामध्ये खूप हातभार लावतात. तसंच हे पदार्थ तुमच्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन या दिवसांत नियमितपणे केलं गेलं पाहिजे.

तुळशीचा चहा

तुळशीमुळे आईच्या शरीरातील दूधनिर्मिती वाढते, कारण तुळशीमध्ये व्हिटॅमिन 'के' असतं, आणि त्यामुळे ब्रेस्टमिल्क मध्ये वाढ होते. तुळस पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उकळून घ्या आणि त्यात एक चमचा मध टाकून प्या. यामुळे दूधनिर्मिती फार वेगाने वाढते.

या सगळ्या व्यतिरिक्त, तुमचा आहार संतुलित असू द्या कारण ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. हिरव्या पालेभाज्या आणि ऋतुमानानुसार उपलब्ध असणाऱ्या फळांचं सेवन जरूर करा.

 

Translated by Anyokti Wadekar

loader