“मी एक अयशस्वी गृहिणी आहे!” – अनुजा चौहान अनसेन्सर्ड!

पुस्तकांमध्ये काहीही लिहिलेलं असलं तरी, यशस्वी करिअर असलेल्या प्रत्येक स्त्रीला हे माहीत असतं की तिला सगळंच मिळवता नाही येत. इंद्रा नूयी सारख्या यशस्वी आणि बिझी स्त्रीपासून ते सर्वसाधारण नोकरी (तितकीच कठीण पण कुठल्याही प्रसिद्धीविना) करणाऱ्या स्त्रियांना हे माहीत असतं की ताळ्यावर राहण्याचा आणि आपण जे काय करतोय त्यात यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अवघड असे पर्याय निवडणं. "माझं सोडा: कुठल्याच पुरुषाला, स्त्रीला किंवा अपत्याला सगळंच मिळत नाही," अनुजा चौहान म्हणतात. "तुम्हाला उपलब्ध पर्यायांमधून तुमची निवड करावीच लागते."

अनुजा चौहान यांच्या बाबतीत, त्यांनी सुरुवातीपासूनच, बाकी सगळ्यापेक्षा आपल्या क्रिएटिव्हिटीच्या अखंडतेला जास्त महत्व देण्याचं ठरवलं होतं. काहीही करायचं असेल तर त्यातल्या क्रिएटिव्हिटीवर ताबा असणं हे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं होतं. "आणि त्यासाठी मी मला मिळणाऱ्या बढत्यांचा त्याग केला; त्यासाठी मी अॅडवर्टायझिंग सोडून लेखनाची निवड केली." आणि हे फक्त करिअर पुरतंच मर्यादित नाही. फॅमिलीच्या बाबतीतही अनुजा यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागले. "मी अगदी थोड्याश्या फरकाने, पतीबरोबर वेळ घालवण्याऐवजी, मुलांबरोबर वेळ घालवण्याची निवड केली.."

गृहिणीच्या भूमिकेऐवजी आपली व्यावसायिक ध्येयं निवडणं ही आतापर्यंतची त्यांची सर्वात मोठी निवड होती. "गृहिणीचं कार्यक्षेत्र मी माझ्या कामवाल्या बाईकडे २३ वर्षांपूर्वीच सोपवलं होतं. तरीसुद्धा मला अपराधी वाटतं - कारण मला माहितीय की मी जर वेळ दिला असता तर मी एक यशस्वी गृहिणी बनू शकले असते...पण त्यासाठी मला वेळच मिळत नाही!" त्या आश्वासकपणे सांगतात.

जे डब्ल्यू टी इंडिया मध्ये १७ वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर, अनुजा यांनी २०१० मध्ये साहित्याच्या क्षेत्रात पूर्णवेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांची पहिली कादंबरी, द झोया फॅक्टर ला, कॉस्मोपॉलिटन मॅगझीन-इंडियाचा फन फिअरलेस फीमेल अवॉर्ड फॉर लिटरेचर आणि इंडिया टुडे वुमन अवॉर्ड फॉर वुमन अॅज स्टोरीटेलर मिळाला. आता त्यांची पाचवी कादंबरी बाज, जी १९७१ मधली प्रेम आणि युद्धाची एक उत्कट कहाणी आहे, त्या कादंबरीच्या प्रमोशनचं काम त्या करत आहेत. अफवांचं असं वादळ उठलं होतं की अनुजा ह्यांच्याकडे इंडियन एअर फोर्स सारखा अवजड विषय हाताळण्याची धमक नाही, पण पुस्तकाची विक्री तर प्रचंड होतेय. एखाद्या लेखकाला मान्यता मिळण्याची याहून उत्कृष्ट पद्धत नाही.

घरी, अनुजा यांना अनुक्रमे २१, १९ आणि १६ वर्षं वयाची निहारिका, नयनतारा आणि दैविक ही मुलं आहेत. तर मग एक वेळ अशी होती की ही तिन्ही मुलं किशोरवयीन होती! आणि एक पालक म्हणून अनुजा यांना ह्या गोष्टींचा उपयोग झाला. तुम्हीही कदाचित त्यांचा उपयोग करू शकता?

१. सुसंबद्धता खूप महत्वाची आहे: तुम्ही मध्येच तुमचे नियम बदलू नाही शकत. जर तुम्ही एखादा नियम बनवला, तर तुम्हाला तो सातत्याने आचरणात आणायला हवा. तुम्ही नियम बनवलेत, तर त्याची सातत्याने अंमलबजावणी करून घेण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी. नियम बनवला आणि एक दिवस थोडं ढिलेपणाने सोडून दिलं आणि म्हटलं... ठीक आहे, जाऊदे - तर तसं चालत नाही. मुलांनी तुमचा आदर करायला हवा असेल तर तुम्ही सुसंबद्ध असायला हवं. त्यांना कळायला हवं की आई नुसतंच बोलत नाही आहे तर ती तसं करेलही.

२. सुसंवाद फार महत्वाचा आहे: तुम्ही तुमच्या मुलाशी बोलायला हवं. १०० टक्के लक्ष देऊन बोलण्यासाठी आपण वेळ काढायला हवा, आणि मुलांनीही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. ह्या सुसंवादामध्ये आपले अनुभव शेअर करण्याचाही समावेश होतो.

३. प्रामाणिकपणा: कृपया तुमच्या मुलांशी खोटं बोलू नका, किंवा तुम्ही लहान असताना कधीही चुका केल्या नाहीत किंवा मूर्खपणा केला नाहीत, असा खोटा दिखावा करू नका. मुलं तुमच्या यशापेक्षा चुकांमधून जास्त शिकत असतात - तुमच्याकडून सुद्धा चुका होऊ शकतात हे पाहून त्यांना दिलासा मिळतो. म्हणून त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहा, आणि उगाच आपण धुतल्या तांदळाचे असल्याची खोटी प्रतिमा त्यांच्यासमोर उभी करू नका. तसंच त्यांना कुठलीही गोष्ट स्वतःच्या उदाहरणाने पटवून द्या. तुम्हाला जर त्यांनी, धूम्रपान, शिव्या देणं, दारू पिणं, पोर्नोग्राफी बघणं, वेगाने गाडी चालवणं, ह्या गोष्टी करू नयेत असं वाटत असेल, तर तुम्ही स्वतःसुद्धा ह्या गोष्टी करू नका.

पण काही गोष्टी अशा आहेत ज्या बाबतीत अनुजा ह्यांनी मुलांना मोकळं सोडायचा निर्णय घेतलाय

१. धर्म: मुलं आपला स्वतःचा आध्यात्मिक मार्ग स्वतः निवडतात. आणि मुख्य म्हणजे कुणाच्या डोक्यात कोणता धर्म निर्माण होतो ह्यावर तुम्ही तुमचा ताबा सांगू शकत नाही. माझा नवरा कट्टर ख्रिश्चन आहे, तर माझी मुलं तशी नाहीत. त्याबाबतीत त्यांचा दृष्टिकोन जास्त सर्वसमावेशक, जास्त धर्मनिरपेक्ष आहे आणि त्यांच्या अस्तित्वाचा तो एक भाग आहे आणि आमची त्याला काही हरकत नाही. आणि माझे आणि माझ्या नवऱ्याचे ह्याबाबतीत सतत वाद होतात.

२. लैंगिकता: कुठच्या प्रकारच्या सेक्सला प्राधान्य द्यायचं ह्या त्यांच्या हक्काचं समर्थन ही मुलं अधिक तीव्रपणाने करतात. एकाहून अधिक पार्टनर्स किंवा जेंडर इशूज - आपली प्राथमिक प्रतिक्रिया ज्या गोष्टींना 'अरे देवा काय बोलतोयस तू हे' अशी असेल, अशा गोष्टींच्या बाबतीत ही मुलं खूपच अधिक मनमोकळी आहेत. समलैंगिकता, हेटेरोसेक्शुअॅलिटी, उभयलैंगिकता ह्या विषयांवर जेवणाच्या टेबलावर वादविवाद होतात. त्यामुळे त्यावर आम्ही अशा प्रकारे असहमतीला सहमती दर्शवलीय की बाबांनो तुमची सिस्टीम वेगळी आहे, आम्ही थोडे जुन्या जमान्याचे आहोत.

तुम्ही हे वाचून अनुजा ह्यांच्या आधीच प्रेमात पडला नसाल, तर त्यांचं एखादं पुस्तक वाचा!

पालक आदर्श कधीच नसतात, ते वास्तववादी मात्र असतात.
अनमोल तुम: समाजातल्या सर्व वर्गातल्या खऱ्याखुऱ्या पालकांच्या प्रवासाची कहाणी टेडी डायपर्स ने तुमच्यासाठी आणली आहे. भारतीय मातांसाठी बनवलेले.

Translated by Anyokti Wadekar

फीचर इमेज स्रोत: हिंदुस्तान टाईम्स

loader