प्रत्येक बॉडी टाईप साठी परफेक्ट साडी कशी नेसावी!

साडी हा प्रत्येक सोहळ्याला शोभून दिसेल असा, भारतीय स्त्रियांचा सर्वकाळ आवडता पेहराव आहे. तुम्ही जर योग्य साडी निवडलीत आणि ती अगदी उत्तम प्रकारे नेसलीत तर प्रत्येक स्त्री साडी मध्ये मादक आणि मोहक दिसू शकते. तुमच्या बॉडी टाईपला शोभून दिसेल अशी परफेक्ट साडी नेसण्याकरता ह्या काही टिप्स.

१. अॅपल-शेप्ड बॉडी

कापड: छाती, कंबर आणि पोट या जागी तुम्ही जाड आहात का? तर मग तुमची बॉडी ही अॅपल शेप्ड बॉडी आहे. तुम्ही सिल्क किंवा कॉटनच्या साड्या निवडा ज्या अंगाला घट्ट चिकटून बसत नाहीत आणि त्यामुळे तुमच्या शरीरातले दोष ठळकपणे दिसून येत नाहीत.

झेनपेरेण्ट वर आणखी वाचा: बारीक दिसण्यासाठी सेलिब्रिटीजची १५ अदभुत, नवीन ब्लाऊज सिक्रेट्स!

पॅटर्न: ज्यावर भरपूर एम्ब्रॉयडरी केली असेल आणि एम्ब्रॉयडरीचे रुंद काठ असतील अशी तुमच्या बॉडी टाईपला साजेशी साडी निवडा

नेसायची पद्धत: साध्याच पद्धतीने साडी नेसून पदर सैलसर सोडलात तर तुमच्यासाठी ठीक राहील, कंबर झाकली जाईल एवढ्या लांबीचा ब्लाऊज घाला.

२. पेअर-शेप्ड बॉडी

कापड: तुमच्या शरीराच्या वरच्या भागापेक्षा तुमचे नितंब रुंद असतील आणि त्याखालचा भाग मोठा असेल तर तुमची बॉडी पेअर शेप्ड आहे. तुम्ही शिफॉन किंवा जॉर्जेटच्या साड्या निवडायला हव्या ज्या तुमच्या शरीराच्या वरील व खालील भागामध्ये छान समतोल साधतात.

पॅटर्न: छोट्या प्रिंटच्या, एम्ब्रॉयडरी असलेल्या आणि विरोधी रंगाचे सुंदर काठ असलेल्या साड्या तुम्हाला शोभून दिसतील.

नेसायची पद्धत: साडीचा पदर पुढच्या बाजूला घेऊन साडी नेसा. मरमेड स्टाईलने साडी नेसू नका कारण त्यामुळे तुमच्या शरीराच्या खालच्या भागाकडे लक्ष वेधलं जातं.

३. लठ्ठ

कापड: तुमच्या बॉडी शेपला शिफॉन आणि सिल्कच्या साड्या खूप शोभून दिसतात. कॉटनच्या कडक साड्यांपासून आणि तागाच्या साड्यांपासून दूर राहा कारण त्यामुळे तुम्ही अजून जास्त लठ्ठ दिसाल. त्याऐवजी तुम्हाला आवडत असेल तर हॅण्डलूमच्या साड्या निवडा.

पॅटर्न: गडद रंगांमुळे तुम्ही बारीक दिसाल त्यामुळे गडद रंगाच्या आणि छोट्या प्रिंटच्या साड्या निवडा.

नेसायची पद्धत: तुम्ही साडी कशी नेसता याने खूप फरक पडतो. साध्याच तर्‍हेने साडी नेसा, लांब बाह्यांचे ब्लाऊज घाला आणि फॅट लपवण्यासाठी पदर मोकळा सोडा.

४. ठेंगणी-ठुसकी

कापड: कॉटन, सिल्क आणि नेटच्या साड्यांमुळे तुमचं शरीर भरीव दिसतं. अंगाला बिलगणारी किंवा घट्ट चिकटून बसणारी कापडं निवडू नका, त्यामुळे तुम्ही आणखीनच बारीक दिसाल.

पॅटर्न: सडपातळ स्त्रियांवर बारीक काठाच्या आणि छोट्या प्रिंटच्या साड्या चांगल्या दिसतात आणि त्यामुळे अशा स्त्रिया, आहेत त्यापेक्षा उंच दिसतात. पण भडक, मोठ्या काठाच्या आणि तशाच प्रिंटच्या साड्या कधीही निवडू नका.

नेसायची पद्धत: पारंपरिक पद्धतीने साडी नेसा, पदराच्या प्लीट्स घालून खांद्यावर बसवून पिन लावा, यामुळे तुमची फिगर थोडी भरीव दिसेल. स्लीव्हलेस ब्लाऊज मुळे तुमचे हात आणखीनच बारीक दिसतील. म्हणून पफ स्लीव्ह किंवा नेट स्लीव्हचे ब्लाऊज निवडा.

५. आवरग्लास फिगर

कापड: जर तुमची आवरग्लास फिगर असेल तर जॉर्जेट, शिफॉन आणि नेटच्या साड्या निवडा ज्या तुमच्या अंगाला बिलगून बसतील आणि तुमचं घाटदार शरीर आणखी उठून दिसेल.

पॅटर्न: गडद रंगाच्या आणि साधी एम्ब्रॉयडरी असलेल्या किंवा मग फिकट रंगाच्या आणि मोठ्या काठाच्या साड्या निवडा. तुम्ही सडपातळ असल्याने उजळ रंगाच्या उठून दिसणाऱ्या प्रिंट्स निवडू शकता.

नेसायची पद्धत: साडीच्या निऱ्या अगदी परफेक्ट काढा ज्यामुळे तुमची परफेक्ट फिगर तुम्ही दिमाखात मिरवू शकाल. बटरफ्लाय स्टाईलचा पदर किंवा लहान प्लीट्सचा पदर तुमच्यावर उत्तम दिसेल. ग्लॅमरस लुक साठी स्लीव्हलेस किंवा बॅकलेस ब्लाऊज घाला.

Translated by Anyokti Wadekar

loader