लग्नानंतर किती दिवसांनी बाळाचं प्लॅनिंग करणं योग्य मानलं जातं?

लग्नानंतर प्रत्येक जोडपं सर्व काही प्लॅनिंग निशी करत असतं, खासकरून जेव्हा मुलांचा प्रश्न येतो. कारण काही स्त्रियांना लग्नानंतर लगेच मूल हवं असतं तर काही स्त्रिया थोड्या दिवसांनंतर प्लॅनिंग करतात. पण आज आम्ही या बाबतीत बोलणार आहोत की लग्नानंतर किती दिवसांनी बाळाचं प्लॅनिंग करणं योग्य मानलं जातं. यासंबंधित काही गोष्टी खाली सांगितल्या गेल्या आहेत ज्यावर तुम्ही एकवार जरूर विचार करा. या गोष्टी खालील प्रमाणे आहेत-

२० व्या वर्षानंतरच मुलांचं प्लॅनिंग करा

सहसा मुली शारीरिक पातळीवर प्रजननासाठी मुलांच्या आधी तयार होतात पण मूल होऊ द्यायचं असेल तर ते २० व्या वर्षानंतर होऊ देणं योग्य मानलं जातं. कायद्यानुसार मुलीचं वय लग्नासाठी किमान १८ वर्षं असणं आवश्यक आहे, आणि असं याकरता आहे जेणेकरून गर्भधारणेच्या वेळी मुलीला कमीत कमी शारीरिक समस्या व्हाव्यात. बऱ्याचदा असं दिसून आलंय की ज्या मुलींची २० व्या वर्षाआधीच गर्भधारणा होते त्यांच्यात खूप गुंतागुंतीच्या समस्या आढळून येतात. एवढंच नाही, तर ज्या मुलींची गर्भधारणा १८ व्या वर्षाआधीच होते त्यांची मुलं मानसिक पातळीवर कमजोर असतात. तसंच अशी मुलं इतर सामान्य मुलांपेक्षा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमजोर असतात. म्हणून २०व्या वर्षानंतरच मुलाचं प्लॅनिंग करा.

जर तुमचं लग्न २३ व्या वर्षानंतर झालं असेल तर

जर तुमचं लग्न वय वर्षं २३ किंवा त्यानंतर झालं असेल तर तुमचं शरीर गर्भधारणेसाठी पूर्णपणे तयार आहे. कारण यावेळी स्त्रीच्या अंडकोशातील अंड्यांची गुणवत्ता चांगली असते. तसंच पुरुषही यावेळी प्रजननासाठी तयार असतात. म्हणून आई बनण्यासाठी हा काळ योग्य मानला जातो.

जर तुमचं लग्न २६ व्या वर्षानंतर झालं असेल तर

अशा स्त्रियांनी ३० वर्षं वयाआधी एका मुलाचं प्लॅनिंग नक्की केलं पाहिजे. कारण ३० वर्षाआधी गर्भधारणा सहजगत्या होते. ३० नंतर गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. म्हणून मुलाच्या जन्मास फार उशीर न लावणं योग्य, खासकरून जर तुम्हाला दोन मुलं हवी असतील तर.

जर तुमचं लग्न ३० व्या वर्षानंतर झालं असेल तर

अशा स्त्रियांनी फार विचार न करता किंवा फार उशीर न करता लवकरात लवकर मूल होऊ देण्याचा विचार केला पाहिजे. जर तुम्हाला मूल हवं असूनही तुमची गर्भधारणा होत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरला संपर्क केला पाहिजे.

३५ व्या वर्षानंतर गर्भधारणा

ज्या स्त्रिया ३५ वर्षानंतर गर्भधारणा करतात त्यांच्यात गर्भपाताचा धोका सुद्धा वाढतो. एवढंच नाही तर अशा स्त्रियांना प्रसूती नंतर देखील अनेक प्रकारचे आजार किंवा शारीरिक समस्या होऊ शकतात.

तसं पाहिलं तर काही स्त्रिया वय वर्षं ४० नंतर देखील गर्भधारणा करतात पण मग त्यादरम्यान त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यासोबतच डॉक्टरच्या देखरेखीखाली राहण्याची गरज पडते.

एका संशोधनाअंती असं दिसून आलंय की स्त्रियांमध्ये गर्भधारणेसाठी योग्य वय २२ वर्षांपासून ३५ वर्षं हे आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त वय असल्यास स्त्रियांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

 

Translated by Anyokti Wadekar

loader