तुमच्या बाळाच्या डोक्यावर केवढे केस असतील हे अशा प्रकारे माहीत करून घ्या!

तुमच्या कधी लक्षात आलंय का, की काही बाळांना जन्मतःच भरपूर केस असतात आणि इतर काही बाळं मात्र पूर्णतः टकली असतात? हे जरी बहुतांशी तुमच्या जनुकांशी संबंधित असलं, तरी गरोदरपणाच्या बाबतीत एक ठरावीक दंतकथा आहे ज्यामुळे तुमच्या बाळाच्या केसांच्या बाबतीत तुम्हाला माहिती मिळवता येईल. 

इथून निवडले आहे: क्युअरजॉय 

तुमचं लहानगं मूल या जगात येताना बिलियर्डच्या चेंडूसारखं तुळतुळीत टकलं म्हणून आलं की त्याच्या त्या इवल्याश्या डोक्यावर भरपूर केस होते? तुम्हाला तो दिवस आठवतो का? काही बाळं जन्मतः बरीचशी टकली असतात तर इतर बाळं त्याच्या अगदी उलट असतात - पूर्ण डोकंभर भरपूर केस असलेली. असं का, ते तुम्हाला माहीत आहे का? 

तुमचं बाळ एकतर खूपच टकलं किंवा मग डोक्यावर भरपूर केस असलेलं का आहे, यावर तुम्ही डोकं खाजवत बसण्याआधी तुम्हाला हे जाणून घ्यायला हवं. 

तुमच्या बाळाच्या केसांचा प्रकार आणि रंग तुमच्या जनुकांद्वारे आणि वांशिकतेद्वारे निश्चित होतो. तुमच्या बाळाचे केस चमकदार-सरळ-फिकट तपकिरी रंगाचे असण्याची शक्यता बहुतकरून तेव्हा असते, जेव्हा तुमचेही केस तसेच असतात! जर तुमच्या साथीदाराचे केस पातळ, कुरळे असतील आणि तुमचे केस 'रपंझल' ह्या परिकथेतल्या मुलीसारखे सरळ आणि दाट असतील तर तुमच्या बाळाला एकतर तुमच्या जोडीदाराच्या जनुकांमुळे त्याच्यासारखेच किंवा तुमच्या जनुकांमुळे तुमच्यासारखे घनदाट आणि आकर्षक केस लाभतील. 

ही गोष्ट बहुतांशी बाळांच्या बाबतीत खरी असणं खूप शक्य आहे, पण काही अपवाद देखील असतात. तुमच्या बाळाचे केस फिकट तपकिरी रंगाचे असले पण तुमचे तर केस तसे नाहीत, तर आश्चर्यचकित होऊ नका! असं दिसून येतं की, जन्माच्या वेळी तुमच्या बाळाचे केस कसेही असले तरी पुढे जाऊन ते बदलतात. जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांत नवजात बाळांचे केस झडतात. हे नॉर्मल आहे. ९व्या ते १२व्या महिन्यात त्यांचे केस पुन्हा उगवू लागतात. हे जे नवीन केस उगवतात, ते आधीच्या केसांहून सुस्पष्टपणे वेगळे असतात. तुमच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे लालसर, कुरळे, सुंदर केस पुढे जाऊन फिकट तपकिरी रंगात बदलू शकतात. 

जर तुम्ही गरोदर आहात आणि अंदाज बांधत आहात, की तुमचं बाळ कसं असेल - टकलं की छानदार केस असलेलं, तर गरोदरपणाच्या बाबतीतली एक दंतकथा सांगण्यासारखी आहे. ह्या दंतकथेनुसार असं म्हटलं जातं की ज्या गरोदर स्त्रियांच्या छातीत खूप जळजळ होते त्यांची बाळं शक्यतो सुंदर, आकर्षक केसांसह जन्मतात. काहीजण याला फक्त एक दंतकथा मानत असले तरी २००६ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार गरोदरपणादरम्यान होणाऱ्या छातीतल्या जळजळीची तीव्रता आणि नवजात बाळाचे केस यांमधला परस्परसंबंध खरा आहे. 

फीचर इमेज स्रोत: पिंटरेस्ट 

Translated by Anyokti Wadekar

loader