असुरक्षित सेक्स केलंत? मग लगेचच किचनकडे धाव घ्या! या कारणांसाठी

तर मग तुमचे हार्मोन्स उफाळून आले आणि काल रात्री तुम्ही पलंगात अक्षरशः धुमाकूळ घातलात? तर असं आहे की, तुम्हाला जरी खूप रतिसुख मिळालं असलं तरी आम्हाला माहितीय तुम्हाला कशाची चिंता वाटतेय. सेक्स काही फक्त 'सुरक्षित' काळात होत नाही. कधीकधी आपला ताबा सुटतो आणि आपण 'योग्य' वेळेची वाट सुद्धा पाहत नाही. पण तरीही तुम्हाला गरोदर नक्कीच व्हायचं नसतं.

बाजारात गर्भनिरोधक साधनं सहज उपलब्ध असली तरी काही घरगुती उपाय देखील रामबाण असतात. त्या नकोशा गर्भधारणेपासून तुम्हाला तुमच्या किचनमधल्या या काही गोष्टी वाचवू शकतात!

१. गर्भनिरोधक गोळ्या

असुरक्षित सेक्सवरचा सर्वांत पहिला आणि सर्वांत प्रमुख उपाय म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या. औषधांच्या दुकानांमध्ये सहजगत्या उपलब्ध असणाऱ्या या गोळ्यांचा असर व्हावा म्हणून त्या एका विशिष्ट कालावधीत घ्यायच्या असतात (संभोगाच्या नंतर ४८ तासांच्या आत). जर तुम्ही नियमितपणे सेक्स करत असाल तर या गोळ्या घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा जेणेकरून त्याचे काही साईड इफेक्ट्स होणार नाहीत.

२. इतर बाबींचा विचार करा

फक्त असुरक्षित सेक्समुळेच मासिक पाळी उशिरा येते असं नाही. अखेर, शुक्राणू आणि स्त्रीबीजाचं मिलन होणं एवढं सोपं नाही! म्हणून इतर घटकांचाही विचार करा. मानसिक ताण आणि तणावामुळे सुद्धा मासिक पाळीला उशीर होऊ शकतो.

३. तिखट, झणझणीत पदार्थ

तिखट आणि झणझणीत पदार्थांमुळे तुमच्या शरीरातली उष्णता वाढते, त्यामुळे तुमची मासिक पाळी लगेचच येते. म्हणून मग असुरक्षित सेक्स केल्यानंतर झणझणीत असे पदार्थ भरपूर खा.

४. पिकलेला पपई

'असुरक्षित' अशा काळात तुम्ही सेक्स केलंय अशी एकदा का तुमची खात्री झाली की मग एक बाऊलभर पपई खा. चकित झालात? चकित होऊ नका! तुमची त्वचा निरोगी ठेवण्याव्यतिरिक्त पपईमुळे तुमच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते, त्यामुळे तुमची मासिक पाळी लवकर येते. पपईमध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे इस्ट्रोजन हे हार्मोन वेगाने तयार होतं आणि पाझरू लागतं. त्यामुळे पुढे मासिक पाळी लवकर येते आणि गरोदर राहण्याची शक्यता टळते.

५. अननस

अननसामध्ये अशी काही एन्झाइम असतात ज्यामुळे लगेचच मासिक पाळी येते. अननसाचा ज्यूस बनवा किंवा मग तुमच्या सॅलडमध्ये त्याचा समावेश करा. असं असलं तरी अननसाने आपलं काम करावं म्हणून तुम्ही तो भरपूर प्रमाणात खायला हवा. नकोशी गर्भधारणा थांबवण्याचा हा एक सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.

६. डाळिंब

डाळिंब हा लोह आणि इतर अनेक क्रियाशील घटकांचा उत्तम स्रोत आहे, ज्या घटकांमुळे शरीरातील नैसर्गिक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची पातळी पुन्हा समतोल केली जाते, आणि त्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास चालना मिळते. तुम्ही डाळिंबाचा रस सुद्धा गुळासोबत मिसळून दिवसातून ३-४ वेळा घेऊ शकता जेणेकरून तुमची मासिक पाळी लवकर येईल.

७. तीळ

तुम्ही तुमच्या आईला विचारलंत तर ती नक्कीच तुम्हाला हा उपाय सुचवेल! २ चमचे तीळ १ कप गरम पाण्यात भिजवत ठेवा. ते तसेच १० मिनिटं भिजवत ठेवा आणि मग ते पाणी गरमच प्या. उत्तम परिणामाकरता हे पाणी दिवसातून कमीतकमी २ वेळा प्या. जर तुम्ही नियमितपणे हा उपाय केलात तर १० ते १५ दिवसांत तुमची मासिक पाळी येऊ शकते.

८. गूळ

ती नकोशी असलेली गर्भधारणा एका 'गोड' तऱ्हेने घालवा. होय. गुळामुळे हार्मोन्सचा चयापचय होतो आणि ती नॉर्मल पातळीवर राहतात. ब्रेकफास्टच्या पूर्वी उपाशी पोटी गूळ हा तिळासोबत ज्यूस बनवून घ्या किंवा मग गूळ आणि आल्याच्या रसाचं एक हेल्दी मिश्रण बनवून ते घ्या ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि मासिक पाळी लवकर येईल.

९. आलं आणि अजमोदा (पार्स्ली)

अजमोद्यामुळे (पार्स्ली) स्त्रीच्या शरीराला भरपूर फायबर आणि पोषण मिळतं. आलं आणि अजमोद्याचा रस काढा आणि तो दिवसातून २-३ वेळा प्या जेणेकरून तुमची मासिक पाळी लवकर येईल आणि गर्भधारणा टाळली जाईल. अँटीऑक्सिडंट्सच्या गुणांमुळे गर्भाशय प्रसरण पावतं आणि त्यामुळे मासिक पाळी लवकर येते. तुम्ही हा चवदार रस बनवा आणि तुमची पाळी येईपर्यंत पीत राहा.

१०. व्हिटॅमिन सी

चुकलेल्या मासिक पाळीवर व्हिटॅमिन सी हा अत्यंत उत्तम उपाय आहे. तुम्हाला फक्त अशी फळं शोधायचीयत ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी हा असा अदभुत घटक आहे जो तुमच्या गर्भाशयाच्या अस्तरामध्ये इस्ट्रोजन निर्माण करू शकतो, आणि त्यामुळे तुमच्या मासिक पाळीला यायला वेळ लागत नाही आणि ती प्रभावीपणे येते.

Translated by  Anyoti

loader