तुमची सासू तुमच्यावर प्रेम करते की तुमचा तिरस्कार करते हे जाणून घ्या!

तुमच्या कधी हे लक्षात आलंय का की जेव्हा आपण "सासूविषयीच्या समस्या" असं म्हणतो तेव्हा त्या सगळ्या हकिकतीत सर्वसाधारणतः मुलीच्या पालकांचा समावेश नसतो? हे पुरुषप्रधान संस्कृतीचं उदाहरण आहे! सुनांना अशा एका स्त्रीशी झगडावं लागतं जिला सगळं कळतं, जिने खूप काही पाहिलंय आणि त्याहून अधिक वाईट म्हणजे ती सगळीकडे आपल्या पाठोपाठ असते!

खरंतर सासूची ही अशी प्रतिमा जितक्या लवकर तुटेल तेवढं बरं. हे खरंय की भारतातल्या सासवा हुकमत गाजवणाऱ्या असू शकतात. खासकरून, त्यांची बऱ्याचशा विषयांवरची मतं तुमच्या मतांहून अगदी विरुद्ध असतील तर त्यांच्याशी संबंध राखणं खूपच वैताग आणणारं ठरतं. त्याहून आणखी वाईट म्हणजे, त्यांची ही मतं वेगवेगळ्या वादविवादांमधून/ संभाषणांमधून बऱ्याच अवधीनंतर समोर येतात. बऱ्याचदा, जोपर्यंत तुम्हाला कळतं की तुमच्या सासूची महत्वाच्या विषयांवरची खरीखुरी मतं काय आहेत, तोवर तुमच्या लग्नाला आधीच दहा वर्षं झालेली असतात आणि तुम्हाला मूल किंवा मुलं असतात.

काळजी करू नका, आमच्याकडे ह्या धडकी भरवणाऱ्या 'सासू' शी मतभेद कमी करण्यासाठी, वेळेच्या परिमाणावर जोखलेला इलाज आहे.

तुमच्या सासूला जाणून घ्या:

माणसं सगळीकडे सारखीच असतात आणि तुमच्या सासूच्या व्यक्तिगत परिस्थितीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्यामुळे तुम्हाला नक्कीच तिचा स्वभाव किंवा वागणं जाणून घेता येईल. तुमच्या पतीद्वारे, किंवा त्याच्या भावंडांकडून किंवा त्याहून चांगलं म्हणजे स्वतः सासूकडून सासूला जाणून घ्या. तिच्या आयुष्यात झालेल्या मोठ्या उलथापालथी किंवा झालेले बदल किंवा आलेली अनपेक्षित वळणं ह्या सर्वांचा नक्कीच तिच्या आयुष्यावर प्रभाव पडलेला असतो.

उदाहरणार्थ:

  • तिची मुलं केव्हा किंवा कशी जन्मली? तेव्हा तिची परिस्थिती कशी होती? तिची कुणी कधी टर उडवली होती का?

  • जेव्हा पैसा कमी आणि जबाबदाऱ्या जास्त होत्या, तेव्हा तिने काय केलं?

  • तिला तिच्या आयुष्यातल्या स्वप्नांबद्दल आणि इच्छा-आकांक्षांबद्दल विचारा.

तुम्ही तिच्या आयुष्याबद्दल चौकस झालात आणि तिचा भडका उडेल अशा गोष्टी करणं/बोलणं बंद केलंत, की तुमचे अर्धे प्रॉब्लेम्स संपतील.

ही आहे प्रश्नांची एक साधीशी यादी ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमची सासू तुमच्यावर प्रेम करते की तुमचा तिरस्कार करते

१. ती तुम्हाला जाणून घ्यायचा प्रयत्न करते का?

तिने कधीतरी तुम्हाला विचारलंय का की तुम्हाला काय खायला आवडेल, किंवा लहानपणी तुम्हाला कुठली गोष्ट सर्वात जास्त महत्वाची वाटायची? तुम्हाला तुमच्या कॉफीमध्ये किती दूध लागतं हे तिला माहीत आहे का?

हो? - ती तुमच्यावर प्रेम करते

नाही? - ती तुमच्यावर प्रेम करत नाही

२. ती तुमची तुलना तिच्या मुलींशी किंवा तिच्या इतर सुनांशी करते का?

ती दुसऱ्या स्त्रियांच्या गुणांचं/ रीतीभातींचं वर्णन अशा प्रकारे करते का ज्यातून ती तुम्हाला दर्शवते की तुम्ही त्या गुणांचं अनुकरण केलंच पाहिजे?

नाही? - ती तुमच्यावर प्रेम करते

हो? - ती तुमच्यावर प्रेम करत नाही

३. ती तुमच्या बाजूने उभी राहते का?

घरी किंवा बाहेर, तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात ह्यावर ती विशेषत्वाने भर देते का आणि ती तुमच्या निवडींचा आदर करते का?

हो? - ती तुमच्यावर प्रेम करते

नाही? - ती तुमच्यावर प्रेम करत नाही

४. ती तुमच्या मुलांची चांगली काळजी घेते का?

तुम्ही तुमच्या मुलासाठी बेबीसिटर शोधत असता तेव्हा तुमचा पहिला चॉईस तुमची सासू असते का? ती तुमच्या मुलांच्या पालनपोषणाच्या पद्धतीचा आदर करते का आणि तुमच्या अनुपस्थितीत त्याच पद्धतीने मुलाचं पालनपोषण करते का? तुम्हाला सोयीस्कर ठरणार नाहीत अशा गोष्टी तुमच्या मुलाला सांगणं ती टाळते का?

हो? - ती तुमच्यावर प्रेम करते

नाही? - ती तुमच्यावर प्रेम करत नाही

५. ती खास प्रसंगांच्या वेळी तुमची आठवण ठेवते का?

खास प्रसंगी ती तुम्हाला कॉल करून सांगते का, की तिला तुमची आठवण आली? तुम्ही परत कामावर जायला लागलात तो दिवस तिच्या लक्षात आहे का? तुमचा ताप उतरला की नाही हे ती कॉल करून विचारते का?

हो? - ती तुमच्यावर प्रेम करते

नाही? - ती तुमच्यावर प्रेम करत नाही

Translated by Anyokti Wadekar

loader