ओव्हेरियन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं जी स्त्रियांनी दुर्लक्षित करू नयेत

ओव्हेरियन कॅन्सर ही स्त्रियांमध्ये होणारी सर्वात सर्वसामान्य समस्या आहे, ज्यामुळे कोणत्या ना कोणत्या स्त्रीला यातून जावं लागतं. ओव्हेरियन कॅन्सरच्या दरम्यान स्त्रियांच्या अंडाशयात छोटे छोटे 'सिस्ट' बनतात ज्यामुळे त्यांना गर्भधारणेत अडथळा निर्माण होतो. परंतु, स्त्रियांनी याचं लक्षण योग्य वेळी ओळखल्यास या समस्येचं निराकरण केलं जाऊ शकतं.

सहसा याला अंडाशयाचा किंवा ओव्हरी कॅन्सर असं म्हटलं जातं, ज्याची सुरुवात अंडाशयात होते. अशा प्रकारची समस्या झाल्यामुळे याचा प्रभाव सरळसरळ स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर होतो.

याची लक्षणं काय आहेत?

सामान्यतः या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांचा थांगपत्ता योग्य वेळेवर लागत नाही ज्यामुळे स्त्रियांना पुढे जाऊन खूप त्रास सोसावा लागतो. खाली याची काही सुरुवातीची लक्षणं सांगितली गेली आहेत जी ध्यानात ठेवून तुम्ही याच्या लक्षणांवर नजर ठेवू शकता, ही लक्षणं खालीलप्रमाणे आहेत 

पोटामध्ये सूज येऊन वेदना होणं

खाल्ल्यानंतर पोटात दुखणं

वारंवार लघवी होणं

लघवी करण्यात अवघडता निर्माण होणं

खूप जास्त थकवा जाणवणं

आंबट ढेकर

छातीत जळजळ

मलावरोधाची समस्या

पाठदुखीची समस्या

संभोगाच्या वेळी वेदना होणं इत्यादी रूपांत याची लक्षणं दिसून येऊ शकतात.

तसं पाहिलं तर या प्रकारच्या लक्षणांची अनेक कारणं असू शकतात, असं नाहीये की ह्या समस्या फक्त ओव्हेरियन कॅन्सरच्या दरम्यानच उत्पन्न होतात. परंतु, जर तुमच्यात या प्रकारची लक्षणं दिसून आली असतील तर त्वरित डॉक्टरला संपर्क करा जेणेकरून याचा वेळेवर इलाज केला जाऊ शकेल.

ओव्हेरियन कॅन्सरचा सर्वात अधिक धोका कोणत्या स्त्रियांना असतो?

सर्वसाधारणतः त्या स्त्रियांमध्ये याचा धोका सर्वात अधिक असतो, ज्यांचा अशा प्रकारच्या कॅन्सरचा काही कौटुंबिक इतिहास असतो. याव्यतिरिक्त जर एखाद्या स्त्रीचं वय ३० वर्षांहून अधिक असेल आणि ती गर्भधारणा करत असेल तर तेव्हा तिच्यात ओव्हेरियन कॅन्सरचा धोका दुप्पट असतो. त्याशिवाय, ब्रेस्ट कॅन्सरने पीडित स्त्रियांना देखील ओव्हेरियन कॅन्सरचा धोका वाढतो. त्यासोबतच, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, जास्त ताणतणाव, मेनोपॉज आणि अॅनीमिया यांसारख्या काही आजारांमुळे ओव्हेरियन कॅन्सर होतो.

यापासून वाचण्यासाठी कोणते उपाय आहेत?

सतत तपासण्या करून घेतल्या पाहिजेत

खासकरून त्या स्त्रियांनी याच्या लक्षणांवर लक्ष ठेवून राहिलं पाहिजे ज्यांच्या घरात या आजाराचा इतिहास असेल. अशा स्त्रियांनी सतत यासाठी स्वतःला तपासून घेत राहिलं पाहिजे.

वजनावर लक्ष ठेवा

जर तुमचं वजन अचानक वाढू लागलं असेल तर वय आणि उंचीच्या अनुसार वजन नियंत्रणात ठेवा. यासाठी तुम्ही व्यायामाची मदतसुद्धा घेऊ शकता.

आपल्या आहाराकडे लक्ष द्या

जर कोणत्या स्त्रीमध्ये याचं लक्षण दिसून आलं असेल तर किंवा यापासून वाचण्यासाठी तुम्ही संतुलित आहाराचं सेवन करा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, पालेभाज्या जसं की ब्रोकली, पालक, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, गाजर इत्यादींचा जरूर समावेश करा.

ओव्हेरियन कॅन्सरचे उपचार काय आहेत?

शस्त्रक्रिया

या आजाराने पीडित स्त्रीसाठी याचा सर्वात यशस्वी उपचार शस्त्रक्रिया हा आहे.

कीमोथेरपी

या प्रक्रियेत औषधांचा उपयोग करून कॅन्सरच्या पेशींना नष्ट केलं जातं.

हॉर्मोन थेरपी

हॉर्मोन थेरपी द्वारे 'एस्ट्रोजन'ला कॅन्सरच्या पेशीपर्यंत पोहोचण्यापासून रोखलं जातं. एस्ट्रोजनचा पुरवठा कमी केल्यामुळे कॅन्सरच्या पेशींचा विकास थांबवला जाऊ शकतो.

 

Translated by Anyokti Wadekar

loader