थ्रेडिंग केल्यावर तुम्हीसुद्धा या चुका करता का?

थ्रेडिंग केल्यावर सहसा मुली कळत नकळत काही अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. या चुका स्त्रिया पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी करतात. कारण थ्रेडिंग नंतर काही स्त्रियांमध्ये पिंपल्सची समस्या दिसून येते.

पण या चुका केल्यामुळे नंतर त्रास होतो. काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही आयब्रो थ्रेडिंग नंतर लगेचच नाही केल्या पाहिजेत, नाहीतर मग समस्या उद्भवतात.

आज आम्ही तुम्हाला याच गोष्टीबद्दल सांगणार आहोत की, आपलं सौंदर्य कायम राखण्याच्या नादात तुम्ही अशा काही गोष्टी करू नका ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. या तर मग, जाणून घेऊया की थ्रेडिंग नंतर काय नाही केलं पाहिजे.

https://hindi.boldsky.com

मॉईश्चरायझरने मसाज करा

तुम्हाला हे सांगायला हवं की काही स्त्रिया थ्रेडिंग करून आल्यावर आयब्रो तशाच सोडून देतात. त्यामुळे तुमच्या आयब्रोमध्ये रुक्षपणा येतो. ज्यामुळे तुम्हाला जळजळ किंवा खाजेची समस्या सुद्धा होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझरने आयब्रोना मसाज केला पाहिजे. यामुळे आयब्रो चांगल्या स्थितीत राहतात.

https://hindi.boldsky.com

बाहेर उन्हात जाऊ नका

लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही थ्रेडिंग करून याल तेव्हा बाहेर उन्हात जाऊ नका. उन्हात जाण्यामुळे समस्या उद्भवू शकतात. आपण जेव्हा शरीराच्या कुठल्याही भागावरचे केस काढतो तेव्हा तो भाग पूर्णपणे संवेदनशील होऊन जातो. यासाठी तुम्ही या समस्येपासून दूर राहायला हवं आणि उन्हात जाता कामा नये.

https://hindi.boldsky.com

मेकअप करू नका

तुमच्या लक्षात आणून द्यायला हवं की तुम्ही नेहमी ही चूक करता. तुम्हाला एखाद्या लग्नाला किंवा पार्टीला जायचं असेल तर थ्रेडिंग केल्यावर लगेचच तुम्ही मेकअप करू लागता. तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, की हे अगदी चुकीचं आहे. यामुळे तुम्हाला बराच त्रास होऊ शकतो. त्यामुळे थ्रेडिंग नंतर लगेच मेकअप करू नका.

https://hindi.boldsky.com

२४ तासांनंतर मेकअप करा

जर तुम्ही थ्रेडिंग केलं असेल तर त्यानंतर लगेचच मेकअप न करता २४ तास झाल्यावरच मेकअप करा. हे तुमच्या त्वचेकरता योग्य ठरेल. तुम्ही जर असं केलं नाहीत तर तुम्हाला पिंपल्सची समस्या होऊ शकते. पिंपल्सपासून तुम्ही स्वतःला कुठल्याही परिस्थितीत दूर ठेवलं पाहिजे कारण हे तुमच्या सौंदर्याला मारक ठरतात.

https://hindi.boldsky.com

थ्रेडिंग केलेल्या जागी बोटं लावू नका

बऱ्याचदा, थ्रेडिंग केल्यावर तुम्ही ही चूक करता, की तुम्ही त्या जागी वारंवार स्पर्श करत राहता. असं करणं खूप त्रासदायक ठरू शकतं. तुम्हाला हे माहीत असायला हवं की तुम्ही असं वारंवार केलंत तर तुम्हाला इंफेक्शन, खाज आणि ब्रेकआउट्सची समस्या देखील होऊ शकते.

https://hindi.boldsky.com

खाज

बऱ्याचदा तुम्हाला हे जाणवलं असेल की थ्रेडिंग केल्यावर तुम्ही त्याजागी खूप खाजवू लागता. असं करणं तुमच्यासाठी त्रासदायक असतं. जरी त्याजागी खाज आली तरी खाजवू नका.

https://hindi.boldsky.com

हे करा

जर तुम्हाला थ्रेडिंग केलेल्या जागी खूप जास्त खाज येत असेल तर खाजवण्याऐवजी त्याजागी मसाज करावा. चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या आणि गुलाबपाण्यात कोरफडीचा गर मिसळून त्याजागी मसाज करा. हे केल्याने काही नुकसानही होणार नाही आणि तुमच्या समस्या देखील दूर होतील.

 

Translated by Anyokti Wadekar

loader