गर्भात वाढणाऱ्या बाळाचं लिंग ओळखण्यासाठी तुम्हीसुद्धा या पद्धतींचा उपयोग करता?

सर्वात पहिली गोष्ट आम्ही तुम्हाला ही सांगू इच्छितो की या लेखात कुठेही मुलगा किंवा मुलगी यामध्ये भेदभाव केला जात नाहीये. या फक्त काही पद्धती आहेत ज्यांद्वारे तुम्ही वेळेच्या आधी जाणून घेऊ शकता की तुमच्या गर्भात वाढणारं बाळ मुलगा आहे की मुलगी. कारण ज्या स्त्रिया पहिल्यांदा आई बनणार असतात त्यांच्यात हे जाणून घेण्याची उत्सुकता फार असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धती सांगणार आहोत ज्यांचा प्रयोग लोकांकडून फार पूर्वीपासून केला जात आहे. ह्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत-

कवटीवरून ओळखणं

या पद्धतीत तुम्ही तुमच्या बाळाच्या कवटीच्या आकाराकडे पाहून हे सुनिश्चित करू शकता की तुमच्या गर्भात वाढत असलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी. फॉरेंसिक अँथ्राॅपोलाॅजीनुसार कवटी हा लिंग ओळखण्याचा दुसरा सर्वात चांगला मार्ग आहे. कारण पुरुषाची कवटी धट्टीकट्टी असण्यासोबतच त्याची हनुवटी चौरसाकार असते. तर स्त्रियांमध्ये हनुवटी अधिक गोलाकार आणि डोक्याच्या वरचा भाग निमुळता असतो.

बेकिंग सोडा टेस्ट

बेकिंग सोड्याद्वारे देखील तुम्ही हे माहीत करून घेऊ शकता की तुमच्या गर्भात वाढणारं बाळ मुलगा आहे की मुलगी. यासाठी तुम्ही दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात तुमची सकाळची लघवी चांगल्या प्रकारे मिसळा. जर त्यात बुडबुडे दिसले तर तुम्ही एका मुलग्याची आई होणार आहात. याउलट जर त्या मिश्रणात काही बदल दिसून आला नाही तर तुमच्या पोटात एक मुलगी वाढत आहे.

मॉर्निंग सिकनेस

मॉर्निंग सिकनेसच्या आधारे देखील हे ओळखलं जाऊ शकतं की तुमच्या पोटात मुलगा आहे की मुलगी. कारण लोकांचं असं मानणं आहे की जर तुम्हाला सकाळच्या वेळी खूप जास्त उलटी आणि मळमळीची समस्या होत असेल, तर तुमच्या पोटात मुलगी आहे. याउलट जर तुम्हाला खूप जास्त मॉर्निंग सिकनेसची समस्या नसेल तर तुम्हाला मुलगा होणार आहे.

मूड मध्ये बदल

गर्भावस्थेदरम्यान एखाद्या स्त्रीच्या मूड मध्ये बदल होत असेल तर तेव्हा असं मानलं जातं की तुमच्या गर्भात एक मुलगी वाढतेय. कारण यावेळी तुमच्या शरीरात अतिरिक्त स्त्री हॉर्मोन्स बनत असतात ज्यामुळे तुमच्या मूड मध्ये बदल होऊ लागतो. याउलट जर तुम्ही गर्भावस्थेत खूप खूश राहत असाल आणि तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असेल, तर तेव्हा असं मानलं जातं की तुमच्या पोटात वाढणारं बाळ म्हणजे एक मुलगा आहे.

आईचं सुंदर दिसणं

आज्या असं सांगतात की गरोदरपणात स्त्रिया जेव्हा सुंदर दिसू लागतात तेव्हा ते मुलगी होण्याचं लक्षण असतं. याउलट जर चेहऱ्याचा रंग काळा पडला असेल किंवा तुम्ही आधीपेक्षा अधिक खराब दिसू लागला असाल तर तेव्हा तुम्हाला मुलगा होण्याची शक्यता अधिक असते.

भूक जास्त किंवा कमी लागणं

जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला भूक जास्त लागत असेल तर तुम्हाला मुलगा होण्याची शक्यता जास्त असते. याउलट गर्भावस्थेत तुम्हाला भूक लागत नसेल आणि तुम्हाला खूप सुस्त वाटत असेल तर तुमच्या पोटात एक मुलगी वाढत आहे.

झोपण्याची पद्धत

तुमची झोपायची पोझिशन देखील बऱ्याच अंशी तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाबद्दल सांगते. जसं की जर एखादी गर्भवती स्त्री जास्तकरून डाव्या कुशीवर झोपत असेल तर ते मुलगा होण्याचं लक्षण असतं. याउलट जर तुम्ही उजव्या कुशीवर झोपत असाल तर ते मुलगी होण्याचं लक्षण असतं.

असं असलं तरी, आम्ही आधीही म्हटलंय की या गोष्टींचा काही पुरावा नाही. कारण आपण सगळे जाणतो की लिंगाच्या आधारावर भेदभाव किंवा लिंगपरिक्षण करणं हा कायद्याने गुन्हा आहे.

 

Translated by Anyokti Wadekar

loader