गर्भात वाढणारी बाळं करतात ह्या ५ गोष्टींचा तिरस्कार, विश्वास नाही बसत? मग स्वतः अनुभवून पाहा

ज्याक्षणी तुम्हाला कळतं की तुम्ही आई बनणार आहात तेव्हा तुम्ही स्वतःपेक्षा जास्त आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळाबद्दल जास्त विचार करू लागता. कारण यावेळी तुम्हाला तुमच्या बाळाकडे अधिक लक्ष द्यावं लागतं जेणेकरून तुमच्या बाळाचा विकास चांगल्या प्रकारे व्हावा. पण तुम्हाला हे माहीत आहे का की तुमच्या काही सवयी बाळाला किती त्रास देतात. होय, तुमच्या काही गोष्टी आणि सवयी बाळाला अजिबात आवडत नसतात आणि त्यांना त्याचा तिरस्कार वाटत असतो.

असं म्हटलं जातं की बाहेर येऊन जगाकडे डोळे उघडून पाहण्याआधीच बाळांच्या भावनांचा आणि इंद्रियांचा विकास झालेला असतो. एवढंच नाही तर गर्भात असताना बाळं आनंद, उदासपणा, राग आणि दुःख सुद्धा - या सर्व भावनांचा अनुभव घेऊ शकत असतात. याव्यतिरिक्त, ती एवढी संवेदनशील देखील असतात की ती गर्भात असताना चिंता आणि तणाव यातून जाऊ शकतात आणि त्रासून जाऊ शकतात.

बाळं गर्भात असताना आपल्या आईच्या भावनांना सहजगत्या समजू शकत असतात - की त्यांच्या आईच्या मनात आणि डोक्यात काय चाललं आहे. असं यामुळे होतं कारण यादरम्यान जे हॉर्मोन बनतं ते प्लसेंटा मार्गे बाळापर्यंत पोहोचतं.

खाली काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला अजिबात आवडत नाहीत. या गोष्टी खालील प्रमाणे आहेत-

पाय मारणं

जेव्हा केव्हा तुमचं बाळ आतून पोटातून पाय मारू लागतं तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा असतो की ते तुम्हाला जाणवून देत असतं की तुमच्या पोटात त्याचं देखील अस्तित्व आहे. हा आई आणि बाळाच्या मध्ये एक बंध तयार करण्याची बाळाची पद्धत असते. कधी कधी तुम्हाला देखील वाटतं की तुम्हाला सुद्धा तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा स्पर्श अनुभवायला मिळावा आणि तुम्ही तसा प्रयत्न केलात आणि त्यावर बाळ काही प्रतिक्रिया देत नसेल तर तुम्ही तो प्रयत्न थांबवा.

प्रखर प्रकाश

आपल्या बाळासोबत बंध जोडण्याचा एक कष्टप्रद पण थोडा विचित्र उपाय आहे. कदाचित तुम्हाला हे माहीत असेल की भलेही गर्भात असताना बाळाचे डोळे बंद असतील पण बाहेर जेव्हा तुमच्या पोटावर फ्लॅश लाईट टाकला जातो तेव्हा आत असलेल्या बाळाला तो जाणवतो. जसं तुम्ही डोळे बंद केलेत तरी तुम्हाला सूर्यप्रकाश डोळ्यांवर जाणवतो तसंच बाळांचंही असतं. परंतु, बाळ आत पोटात जेव्हा जागं असेल तेव्हा या लाईटला ते प्रतिसाद देतं पण जेव्हा ते झोपलेलं असतं तेव्हा ते लाईटला प्रतिसाद देत नाही.

तुमचा आवाज ऐकणं

बाळंतपणाच्या दुसऱ्या त्रैमासिकात - बाळ बाहेरून येणारे सर्व आवाज - जसं की सुरेल धुन किंवा गोंगाट - ऐकू शकतं. इतकंच नाही, तर पोटात असताना हे सगळे आवाज ऐकल्याने, जन्म झाल्यावर बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात बाळाला मदतही होते. तसंच बाहेरून पोटातल्या बाळापर्यंत पोहोचणारा आवाज जेवढा मोठा असेल तेवढीच जास्त प्रतिक्रिया त्यावर बाळाची असते. कित्येक गरोदर महिलांनी तर हे अनुभवलं देखील असेल की जर त्यांच्या आजूबाजूला मोठ्या आवाजात संगीत चालू असेल, तर त्यांना आत पोटात बाळाची हालचाल सुरु झालेली जाणवू लागते. जेव्हा तुम्ही बोलू लागता, तेव्हा तुमच्या बोलण्याच्या आवाजाने बाळाचं पूर्ण शरीर व्हायब्रेट होतं. संशोधनाद्वारे असं लक्षात आलं आहे की जेव्हा एखादी गरोदर स्त्री बोलते तेव्हा तिच्या पोटातल्या बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो. म्हणजे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचं बाळ आणखीनच सजग होतं.

तुमच्या दुःखी होण्याने बाळ सुद्धा होतं दुःखी

जेव्हा तुम्ही काही कारणाने दुःखी असता किंवा तणावात असता तेव्हा तुमच्याहून कितीतरी अधिक तणावात तुमच्या गर्भात वाढणारं बाळ असतं. अशात जर तुम्ही खूप जास्त वेळ तणाव, नकारात्मकता आणि चिंतेने ग्रस्त राहिलात तर त्याचा तुमच्या बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कारण जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त होता तेव्हा जे हॉर्मोन तुमच्या शरीरात तयार होतं ते द्रव पदार्थांच्या द्वारे तुमच्या बाळापर्यंत पोहोचतं आणि तुमच्या बाळाला हानी पोहोचवतं.

तिखट पदार्थ

तुम्ही जे काही खाता त्याची चव तुमचं बाळ देखील घेत असतं कारण गर्भावस्थेच्या प्रारंभिक अवस्थेत त्याची चव घेण्याची क्षमता विकसित झालेली असते. तुम्ही जे काही खाता ते बाळापर्यंत अॅमनियोटिक फ्लूइड द्वारे पोहोचत असतं. म्हणून या दिवसांत जास्त तेलकट, मसालेदार आणि तिखट पदार्थ खाणं टाळा.

 

Translated by Anyokti Wadekar

loader