सी बी एस ई विरुद्ध आय सी एस ई विरुद्ध आय जी सी एस ई विरुद्ध आय बी विरुद्ध राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम

आजकाल मुलांना शिक्षणाचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी आधीपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत. पण एकच अभ्यासक्रम सर्वांसाठी योग्य असेल असं नसल्याने तुमच्या मुलासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य आहे, हे ठरवताना तुम्ही गोंधळून जाऊ शकता. अभ्यासक्रमाची निवड करणं हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. तुमच्या मुलाच्या आणि तुमच्या काय महत्वाकांक्षा आहेत - महाविद्यालयीन शिक्षणासाठी परदेशात जाणं हे तुमचं ध्येय आहे का; तुमच्या नोकरीमध्ये - स्थानिक पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर - वारंवार तुमची बदली होत राहते का; साध्यासोप्या मूलभूत छंदांऐवजी तुमच्या मुलाचे कला आणि संगीत यासारखे बहुरंगी छंद आहेत का; आणि अर्थातच तुम्हाला तो अभ्यासक्रम परवडण्याजोगा आहे का. प्रत्येक अभ्यासक्रमाचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत. 

१. सी बी एस ई (सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन)

फायदे:

हा अभ्यासक्रम पुरवणाऱ्या भरपूर शाळा उपलब्ध 

प्रमाणीकृत पाठयपुस्तकं (एन सी ई आर टी पाठयपुस्तकं)

अभ्यासक्रमाचा दर्जा बहुतांशी महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षेला साजेसा 

खासगी उमेदवारांना आणि संलग्न नसलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी 

गणित आणि विज्ञान ह्या विषयांवर जास्त भर तर भाषा विषयांवर कमी भर 

ज्यांचं भारतातलं निवासस्थान वारंवार बदलत असतं आणि जे एक प्रमाणीकृत अभ्यासक्रम शोधत असतात त्यांच्याकडून या अभ्यासक्रमाला प्राधान्य 

ज्यांना इंजिनीअरिंग/ मेडिकल सारखा पारंपरिक मार्ग निवडायचा असतो त्यांच्याकडून या अभ्यासक्रमाला प्राधान्य 

तोटे:

आय सी एस ई च्या तुलनेत विषयांची संख्या कमी 

सैद्धांतिक दृष्टिकोनावर जास्त भर 

गणित आणि विज्ञान ह्या विषयांवर मुख्यत्वे भर 

अलग अलग विषय निवडण्याऐवजी ११वी आणि १२वी मध्ये तुम्ही विज्ञान, वाणिज्य आणि कला यासारखी शाखा निवडता 

सी बी एस ई ची खोलात माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 

२. आय सी एस ई (इंडियन सर्टिफिकेट फॉर सेकंडरी एज्युकेशन)

फायदे:

आपल्या आवडीचं कुठलंही पाठयपुस्तक अभ्यासासाठी वापरू शकता 

संलग्न नसलेल्या शाळांतील उमेदवारांना परीक्षेस बसण्याची परवानगी नाही 

भाषाविषय,कला आणि विज्ञानावर समसमान भर 

निवड करण्यासाठी अनेक विविध स्वरूपाचे विषय उपलब्ध 

घोकंपट्टी पेक्षा व्यवहारोपयोगी ज्ञानात जास्त रस असणाऱ्यांकडून या अभ्यासक्रमाला प्राधान्य 

तोटे:

व्यावहारिक ज्ञानावर सी बी एस ई पेक्षा जास्त भर, पण आय बी किंवा आय जी सी एस ई इतका नाही 

सी बी एस ई पेक्षा जास्त कठीण आणि जास्त विस्तृत मानला जाणारा अभ्यासक्रम 

सी बी एस ई च्या तुलनेत विषयांची संख्या जास्त 

३. आय बी (इंटरनॅशनल बॅकलॉरिएट)

फायदे:

इंटरनॅशनल बॅकलॉरिएट अभ्यासक्रम हा जगभर लोकप्रिय आहे 

या अभ्यासक्रमाचे ३ विभाग असतात, पी वाय पी (प्रायमरी इयर्स प्रोग्रॅम - शिशुवर्ग ते इयत्ता ५वी, एम वाय पी (मिडल इयर्स प्रोग्रॅम - इयत्ता ६वी ते दहावी) आणि डी वाय पी (डिप्लोमा इयर्स प्रोग्रॅम, अकरावी आणि बारावी)

आय बी मध्ये निर्धारित अशी कोणतीही पाठयपुस्तकं नसतात आणि शिकण्याच्या बाबतीत खूप मोकळीक असते 

अभ्यासक्रमाचा भर विश्लेषणात्मक कौशल्य, भाषा, कला आणि मानवतेवर असतो 

घोकंपट्टीपेक्षा व्यवहारोपयोगी ज्ञानावर जास्त भर असतो 

'डिप्लोमा प्रोग्रॅम कोअर' मध्ये दीर्घ निबंध, कल्पक/ कृतीनिष्ठ/ सेवाभावी प्रकल्प आणि ज्ञानाचा सिद्धांत हे विषय असतात 

डी वाय पी पातळीवर, विद्यार्थी ६ गटांमधून, प्रत्येक गटातला एक असे विषय आणि डिप्लोमा प्रोग्रॅम कोअर निवडू शकतात 

जगात इतरत्र निवासस्थान बदलणाऱ्या पालकांच्या मुलांकडून व ज्यांना आपल्या मुलांना पदवीपूर्व शिक्षणासाठी परदेशात पाठवायचे आहे अशा पालकांडून ह्या अभ्यासक्रमाला प्राधान्य 

तोटे: 

भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये ह्या अभ्यासक्रमाचं नवीनच असं आगमन 

स्थानिक प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी जुळणारा नाही 

सी बी एस ई आणि आय सी एस ई च्या शाळांपेक्षा जास्त महाग 

अतिरिक्त शिकवणीसाठी खासगी शिक्षक मिळणं अवघड 

खासगी विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाहीत 

४. आय जी सी एस ई (इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट फॉर सेकंडरी एज्युकेशन)

फायदे:

९वी आणि दहावी साठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम 

बऱ्याच आंतरराष्ट्रीय शाळांमधल्या अकरावी आणि बारावीच्या आय बी अभ्यासक्रमाची ही नांदी मानली जाते 

निवडीसाठी भरपूर विषय उपलब्ध 

मूल्यमापनामध्ये लेखी व तोंडी परीक्षांचा समावेश 

उपयोजनाकडे कल असलेला अभ्यासक्रम 

काही मूळ विषय जे प्रत्येकाने निवडलेच पाहिजेत आणि मग विषयाच्या ५ गटांमधून एकेक विषय निवडायचा (गणित गट, भाषा गट इत्यादी)

ज्या मुलांचे पालक इतर देशांत निवासासाठी जाणार असतील त्यांच्यासाठी किंवा पदवीपूर्व शिक्षणासाठी ज्यांना परदेशात जायचं असेल त्यांच्यासाठी आदर्श अभ्यासक्रम 

तोटे:

ह्या अभ्यासक्रमासाठी खासगी शिकवणी घेणारे शिक्षक मिळणं कठीण 

सी बी एस ई आणि आय सी एस ई शाळांपेक्षा पेक्षा जास्त महाग 

५. स्टेट बोर्ड (राज्य शिक्षण मंडळ)

फायदे:

भारतातील प्रत्येक राज्याचं स्वतःचं एकमेवाद्वितीय स्टेट बोर्ड 

इतर सर्व बोर्ड पेक्षा सोपा मानला जाणारा अभ्यासक्रम 

सर्व प्रकारच्या क्षमतांच्या सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेणारा सर्वसमावेशक असा अभ्यासक्रम 

जाहीर परीक्षांमध्ये जास्त मार्क मिळवणं सोपं 

ज्या  विद्यार्थ्यांना जास्त वेळ घेणारा स्पोर्ट्स वगैरे सारखा इतर छंद असतो ते त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी ह्या अभ्यासक्रमाची निवड करतात 

जास्त मार्क मिळवण्या सोबतच ज्यांना आय आय टी जे ई ई सारख्या परीक्षांसाठी अतिरिक्त शिकवण्या लावायच्या असतात अशा विद्यार्थ्यांकडून ह्या अभ्यासक्रमाला प्राधान्य 

तोटे: 

इतर अभ्यासक्रमांशी तुलना करता हा अभ्यासक्रम तितका व्यापक नाही. यामुळे बारावीच्या वेळी प्रवेश परीक्षा देताना त्रास होऊ शकतो. 

पारंपारिकरित्या ह्या अभ्यासक्रमात घोकंपट्टी जास्त असते 

राजभाषा ही सहसा एक अनिवार्य असा विषय असते, पण त्या त्या राज्यानुसार हे बदलू शकते 

असं म्हटलं जातं की माणसाला जेवढे जास्त पर्याय उपलब्ध असतील तितकाच जास्त तो असंतुष्ट होत जातो. पालकांची जी द्विधा मनःस्थिती असते त्यामध्ये हल्ली ह्या गोष्टींची भर पडली आहे - अभ्यासक्रमाची आणि शाळेची निवड. आणि फार कमी लोक त्यांनी निवडलेल्या पर्यायाबाबत १००% समाधानी असतात. पण आपण काय केलं पाहिजे तर फक्त आपल्या अवतीभवतीच्या यशाच्या गाथा पाहिल्या पाहिजेत. आपल्या मते कोण जास्त यशस्वी असतं? जो सर्वात जास्त दिमाखदार शाळेत गेला आणि ज्याला सर्वाधिक मार्क मिळाले तो? की ज्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन उत्तम आणि सर्वंकष आहे तो? - यावर आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे. 

Translated by Amyokti Wadekar

loader