लठ्ठपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, एकदा नक्की आजमावून पाहा

लठ्ठपणा आजकाल प्रत्येकाच्या चिंतेचं कारण बनून राहिला आहे, प्रत्येक जण त्यामुळे हैराण असतो. एवढंच नाही तर ह्यापासून सुटकारा मिळवण्यासाठी लोक तऱ्हेतऱ्हेचे उपाय करतात आणि न जाणो कोणकोणत्या ठिकाणांच्या पायऱ्या झिजवतात. पण आज आम्ही तुम्हाला जो उपचार सांगणार आहोत त्यामुळे काही दिवसांतच तुम्हाला लठ्ठपणापासून मुक्ती मिळू शकेल.

लठ्ठपणाचं सर्वांत मोठं कारण काय आहे?

लोकांच्या लठ्ठपणाची बरीचशी कारण असू शकतात, उदाहरणार्थ -

मधुमेह

हृदयरोग

स्ट्रोक

तळणीचे पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाणं

वाईट जीवनशैली

लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणती आयुर्वेदिक औषधं आहेत?

जसं की मी तुम्हाला वर सांगितलं, लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक तऱ्हेतऱ्हेच्या औषधांचा आणि घरगुती उपायांचा वापर करतात. पण यासाठी तुम्ही रामदेव यांच्या दिव्य मेदोहर वटीचं सेवन देखील करू शकता. परंतु ही औषधं किती प्रमाणात आणि कधी घ्यायची आहेत यासाठी तुम्ही पतंजलि चिकित्सालयात नक्की संपर्क करा. कारण तिथे तुम्हाला या औषधांबाबतची योग्य माहिती चांगल्या प्रकारे दिली जाईल. त्यासोबतच वजन कमी करण्याच्या संबंधातलं एखादं नवीन औषध जर उपलब्ध असेल तर त्याचीही माहिती तुम्हाला दिली जाईल.

पण या सर्व गोष्टींव्यतिरिक्त सुद्धा खाली तुम्हाला अशा काही आयुर्वेदिक औषधांबद्दल सांगितलं गेलंय जी तुम्ही नियमित आणि चांगल्या प्रकारे घेतलीत तर तुम्हाला वजन कमी करण्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला दिसून येऊ शकतो. यामध्ये खालील औषधांचा समावेश होतो -

तुळस आणि मध

तुळस तिच्या नैसर्गिक गुणांसाठी ओळखली जाते पण तुम्ही कधी असा विचार केलाय का तुळशीचं सेवन केल्याने लठ्ठपणा देखील कमी होऊ शकतो. जर तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की तुळशीच्या सेवनाने लठ्ठपणा कसा कमी करावा. यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा ८ ते १० थेंब रस आणि २ चमचे मध १ ग्लास पाण्यात मिसळून १० दिवस प्या. तुम्हाला स्वतःलाच जाणवू लागेल की तुमचं वजन हळूहळू कमी होतंय.

त्रिफळा आणि मध

कदाचित तुम्हाला हे माहीत नाही की त्रिफळा तुमच्या शरीरासाठी किती फायदेशीर असतं. कारण यामुळे फक्त लठ्ठपणा दूर होत नाही पोटांच्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. यासाठी तुम्ही रात्री झोपण्याआधी २ मोठे चमचे त्रिफळा चूर्ण ऊनऊन पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून त्यामध्ये १ चमचा मध मिसळून प्या. काही दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येतून मुक्ती मिळेल.

काळी मिरी, मध आणि लिंबू

एवढं तर तुम्हाला आधीच माहीत असेल की लिंबू आणि मध, वजन कमी करण्यासाठी सर्वांत चांगले मानले जातात. जो तो सकाळी सकाळी गरम पाण्यात मध टाकून आणि लिंबू पिळून पितो. पण याबरोबरच अजून एक पदार्थ आहे - काळी मिरी - जिचं सेवन तुम्ही नक्की केलं पाहिजे कारण ही सुद्धा वेगाने वजन कमी करण्यासाठी जाणली जाते. यासाठी तुम्ही दोन ते तीन चमचे लिंबाचा रस, एक चमचा मध आणि अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड एक ग्लास पाण्यात घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि सकाळच्या वेळी उपाशी पोटी प्या. यामुळे लठ्ठपणाबरोबरच शरीरावरील अतिरिक्त चरबी सुद्धा कमी होईल.

अॅलोवेरा (कोरफड) आणि लिंबू

अॅलोवेराचा वापर बहुतकरून सुंदर त्वचा मिळवण्यासाठी केला जातो पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल की हा लठ्ठपणावरचा देखील एक उत्तम इलाज आहे. तसंच याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया बरीच सक्रिय होते आणि त्यामुळे तुमच्या शारीरिक ऊर्जेचा वापर वाढतो. एवढंच नाही तर अॅलोवेरा तुमच्या पचनयंत्रणेला देखील साफ ठेवते. यासाठी तुम्ही अॅलोवेरा चांगल्या प्रकारे धुवून त्याचं जेल (गर) काढून घ्या. त्यात लिंबाचा रस चांगल्या प्रकारे मिसळून हे मिश्रण मग पाण्यासोबत घ्या. यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल.

मध आणि दालचिनी

जर तुम्ही सकाळची सुरुवात मध आणि दालचिनीने केलीत तर यामुळे नुसतीच तुम्हाला लठ्ठपणापासून मुक्ती मिळते असं नाही तर तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया देखील वेगाने वाढते. यामुळे तुमच्या शरीरातले फॅट्स वेगाने कमी होतात. यासाठी तुम्ही अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनीची पावडर आणि एक ते दीड चमचा मध टाकून चांगलं मिसळून घ्या आणि सकाळी उपाशीपोटी प्या.

व्यायाम आणि योगा कडे सुद्धा लक्ष द्या

जर तुम्हाला खरंच तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला व्यायाम आणि योगाची मदत घ्यावी लागेल. कारण या गोष्टीसुद्धा तुमचं वजन वेगाने कमी करतात. म्हणून रोज अर्धा तास योगा करण्याचा प्रयत्न नक्की करा.

असं असलं तरी वजन कमी करण्याआधी, तुम्ही ज्या कुठल्या औषधाचं सेवन करणार असाल त्याबाबत एकवार तुमच्या डॉक्टरला नक्की सांगा. डॉक्टर तुम्हाला त्या औषधाची माहिती आणि डोस याबाबत अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील.

 

Translated by Anyokti Wadekar

loader