या ६ जादुई उपायांनी अपर लिप्स आणि शरीरावर इतरत्र असलेले केस काढा

काही मुली आपल्या चेहऱ्यावरील किंवा शरीराच्या अन्य भागांवरील नकोशा केसांच्या समस्येने बऱ्याच त्रस्त असतात. काही स्त्रियांमधे ह्या नकोशा केसांची वाढ हॉर्मोनल किंवा आनुवंशिक कारणांमुळे होते. हे केस काढणं हे फार कठीण काम असतं, आणि ते काढले गेले नाहीत तर चेहरा विद्रूप व खराब दिसतो. पण आता तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही, कारण काही असे घरगुती उपाय आहेत ज्याच्या आधारे तुम्ही ह्या समस्येतून सुटका करून घेऊ शकता. हे उपाय खालीलप्रमाणे आहेत-

तांदळाचं पीठ आणि दूध

हे मिश्रण चेहऱ्यावरील आणि ओठांच्या वरच्या भागावरील केस काढण्यासाठी वापरतात. यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठात थोडं कच्चं दूध मिसळून वरच्या ओठाच्या वरच्या भागावर लावा. पण लक्षात ठेवा की ही पेस्ट थोडी घट्टसर असली पाहिजे जेणेकरून ती चांगल्या प्रकारे लावता येईल. त्यानंतर ही पेस्ट सुकू द्या व मग रगडून धुवून टाका. या उपायाने तुम्हाला लगेच फरक दिसून येईल.

साखर, कॉर्न फ्लोर आणि मध

या मिश्रणाच्या वापरामुळे बराच काळपर्यंत केस पुन्हा उगवत नाहीत. हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्ही साखर, कॉर्न फ्लोर आणि मध हे तिन्ही पदार्थ चांगले मिसळून घेऊन जिथे केस असतील त्या भागावर लावा आणि ते सुकू द्या. याचा एक थर बनेल. मग आपल्या तर्जनीने हळूहळू हा पॅक काढा. असं केल्याने त्या भागावरचे नको असलेले केस निघून जातील.

हळद आणि बेसन

हे मिश्रण देखील नकोसे केस काढण्यासाठी वापरलं जातं. यासाठी तुम्ही बेसनात हळद मिसळून पेस्ट बनवून घ्या आणि चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवल्यावर हलक्या हाताने रगडून थंड पाण्याने धुवून टाका.

अंड्याचा पॅक

चेहरा किंवा इतर भागांवरील केस काढण्यासाठी तुम्ही अंड्याच्या पांढऱ्या भागाचा वापर करू शकता. ही पेस्ट बनवण्यासाठी तुम्ही एका अंड्याच्या पांढऱ्या भागात एक चमचा कणीक आणि साखर मिसळून घ्या. मग ही पेस्ट चेहऱ्यावर आणि केस असलेल्या इतर भागांवर लावा आणि २० मिनिटे तशीच राहू द्या. एका महिन्याच्या आत तुम्हाला केसांच्या वाढीमध्ये घट झाल्याचं दिसून येईल.

पपई

तुम्ही पिकलेल्या किंवा कच्च्या अशा कुठल्याही पपईचा वापर करू शकता, पण कच्चा पपई जास्त प्रभावी असतो. कारण यामध्ये पॅपेन नावाचं सक्रिय एन्झाईम असतं जे केसांची वाढ कमी करण्यात मदत करतं. यासाठी तुम्ही दोन मोठे चमचे पपईची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद पावडर घेऊन पेस्ट बनवून घ्या. या पेस्टने १५ मिनिटांपर्यंत चेहऱ्याला मसाज करा आणि मग पाण्याने धुवून टाका.

ब्राऊन शुगर

ब्राऊन शुगरचा वापर स्क्रब म्हणूनही केला जातो कारण ब्राऊन शुगरमुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते व नको असलेले केस निघून जाण्यात मदत होते. यासाठी तुम्ही ब्राऊन शुगरमध्ये थोडा मध मिसळून हलक्या हाताने चेहऱ्यावर रगडून लावा. यामुळे हळूहळू नको असलेले केस कमी होऊ लागतील.

या उपायांचा वापर चांगल्या प्रकारे करा कारण याचे परिणाम तुम्हाला महिन्याभरात दिसून येतील.

 

Translated by Anyokti Wadekar

loader