ऑईल मसाज व्यतिरिक्त या ५ गोष्टी तुमचे केस वेगाने वाढवण्यात मदत करतात

केसगळतीच्या समस्येने प्रत्येक स्त्री हैराण आहे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी स्त्रिया बरेच उपाय देखील करून पाहताहेत. मग तो ऑईल मसाज असो किंवा मग हेअर स्पा. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या ध्यानात ठेवल्याने तुम्ही तुमच्या केसांचं आरोग्य ठीक करू शकता. यासाठी खाली काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्ही ध्यानात ठेवू शकता. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो-

चांगल्या शॅम्पूची निवड

 

इमेज स्रोत: health.com

काही स्त्रियांना फक्त आपले केस स्वच्छ ठेवण्याबद्दल माहीत असतं पण त्या हे विसरतात की प्रत्येक शॅम्पू तुमच्या केसांसाठी योग्य असेलच असं नाही. कारण प्रत्येक स्त्रीच्या केसांचं टेक्श्चर (पोत) वेगळं असतं, उदाहरणार्थ कुणाचे केस कोरडे (ड्राय) असतात तर कुणाचे ऑईली. अशा वेळी तुम्ही तुमच्या केसांनुसार शॅम्पूची निवड केली पाहिजे.

कंडीशनर

 

 

 इमेज स्रोत: eligiblemagzine.com

काही मुली असं मानतात की जर तुम्ही स्वतःहून कंडीशनर लावलंत तर मग तुम्ही ते केसांतून धुवून पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. शॅम्पूने केस धुतल्यावर केसांना कंडीशनर जरूर लावा. त्यामुळे तुमचे केस मुलायम आणि गुंतविरहित राहतील.

हेअर सीरम

 

 इमेज स्रोत: YouTube

तुमच्या रुक्ष आणि निर्जीव केसांना पुन्हा सळसळतं बनवण्याचं काम जर कुणी करत असेल तर ते आहे हेअर सीरम. यामुळे तुमच्या केसांमध्ये गुंता तर होत नाहीच पण धूळ आणि घाणीपासूनही केसांचं संरक्षण होतं. सहसा रुक्ष आणि कोरड्या केसांसाठी हेअर सीरम अत्यंत चांगलं मानलं जातं. कारण यामुळे केसांतला गुंता सहजगत्या सुटतो. परंतु हे फक्त शॅम्पूने केस धुतल्यावर ओल्या केसांना लावा आणि केसांच्या मुळांना लावू नका.

हेअर स्टीम

 

 इमेज स्रोत: essence.com

तुम्हाला जर खरंच तुमच्या केसांची मुळापासून काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी हेअर स्टीम हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्ही केसांना तेल लावल्यावर एक टॉवेल गरम पाण्यात भिजवून पिळून घ्या. आता तो टॉवेल केसांना गुंडाळून लावा, यामुळे केसांना लावलेलं तेल केसांच्या मुळापर्यंत पोहोचेल.

हेअर पॅक

 

इमेज स्रोत: Stylecraze

तुम्ही तुमच्या केसांना आठवड्यातून एकदा हेअर-पॅक नक्की लावा. कारण यामुळे केस आतून बळकट होतात. खासकरून पावसाळ्यात केसांतल्या कोंड्यामुळे केस खूप गळतात. अशा वेळी दही, लिंबू आणि मेथी एकत्र करून एक पॅक बनवून घ्या आणि तो केसांना लावा.

फीचर इमेज स्रोत: zeytooni.com

 

Translated by Anyokti Wadekar

loader