वयानुसार सेक्सची किती फ्रिक्‍वेंसी चांगली मानली जाते?

सेक्स बद्दल प्रत्येकाच्या मनात हजारो प्रकारचे प्रश्न असतात, ज्याचं उत्तर प्रत्येकाकडे असतंच असं नाही. पण काही प्रश्न असे असतात जे प्रत्येकाला हैराण करून सोडतात आणि असा एक प्रश्न आहे वयानुसार सेक्सची फ्रिक्‍वेंसी. कारण काही लोकांचं असं मानणं असतं की सेक्स प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये एकसारखं नसतं. हे खरं आहे का, हे तुम्हीसुद्धा जाणून घ्या.

जरी ‘नॉर्मल’ सेक्स सारख्या काही गोष्टी असल्या तरी अॅवरेज तर तुम्ही जाणून घेऊ शकताच. तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगू शकता की तुम्ही दिवसातून दोन वेळा सेक्स करू शकत नसलात तर ही गोष्ट ‘नॉर्मल’ पेक्षा वेगळी नाही. किन्से इंस्टीट्यूट फॉर रिसर्च इन सेक्स, रिप्रोडक्शन अँड जेंडरचं एक संशोधन पाहूया जे एका वैद्यकीय वृत्तपत्रात प्रकाशित झालं आहे.

संशोधनात हे सांगितलं गेलंय

या संशोधनात हे सांगितलं गेलंय की वेगवेगळ्या वयाचे लोक किती सेक्स करतात, जेणेकरून प्रत्येक वयाचा एक अॅवरेज काढला जाऊ शकेल. तुम्ही कदाचित असा अंदाज बांधत असाल की तरुण लोक सेक्ससाठी जास्त लालचावलेले असतात. असंच काहीसं ना? १८ ते २९ वर्षांचे लोक पूर्ण वर्षात ११२ वेळा सेक्स करतात म्हणजे आठवड्यातून २ वेळा. तुमचा अंदाज कदाचित हा नव्हता. ३० ते ३९ वर्षांचे लोक वर्षातून ८६ वेळा सेक्स करतात म्हणजे आठवड्यातून १.६ वेळा. जेव्हा की ४० ते ४९ वर्षांचे लोक वर्षात ६९ वेळा सेक्स करतात.

वयानुसार फ्रिक्‍वेंसीच्या बाबतीत यापेक्षा जास्त वयाच्या लोकांवर संशोधन केलं गेलेलं नाही कारण यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या सेक्स लाईफकडे दुर्लक्ष केलं जातं. आजकालच्या लोकांमध्ये सेक्सची फ्रिक्‍वेंसी कमी होण्याने हे कळून येतं की लोक तणावग्रस्त होत चाललेत. वेगवेगळ्या वयाच्या लोकांची सेक्सची फ्रिक्‍वेंसी:

१८-२९ वर्षे - आठवड्यातून दोन वेळा

३०-३९ वर्षे - आठवड्यातून १.६ वेळा

४०-४९ वर्षे - आठवड्यातून एकपेक्षाही कमी वेळा

सेक्स लाईफ वर प्रभाव पडत चाललाय. आपल्या युवकांमध्ये कुटुंब, घरगुती जबाबदाऱ्या आणि कामामुळे ही क्रिया तितकीशी प्रभावित झालेली नाही. पण वयासोबत या गोष्टी वाढत जातात.

वयासोबत आरोग्यसुद्धा ठीक राहत नाही. जसजसं वय वाढत जातं तसतसे अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे त्याचा सेक्स लाईफ वर प्रभाव पडतो आणि सेक्सची इच्छादेखील कमी होते.

संशोधनकर्त्यांना असं नाही आढळलं की विवाहित लोकांच्या सेक्स लाईफमध्ये किंवा सेक्स फ्रिक्‍वेंसीमध्ये काही फारसा फरक झालाय. ३४% विवाहित लोक आठवड्यातून २ ते ३ वेळा सेक्स करतात, ४५% महिन्यातून कधी-कधी आणि फक्त १३% लोक असे आहेत जे वर्षातून कधी-कधी सेक्स करतात. पण स्वतःची लाज वाटून घेण्याआधी थोडं आपलं वय ध्यानात जरूर घ्या.

 

Translated by Anyokti Wadekar

loader