कॅन्सरची ही ६ लक्षणं ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात

यात काहीच शंका नाही की कॅन्सरचं नाव ऐकूनच माणूस अधमेला होऊन जातो, कारण त्याचा इलाज अजूनही पूर्णपणे संभव झालेला नाही. माणसाला जर कॅन्सर पहिल्या स्टेज मध्ये असताना कळून आलं की आपल्याला कॅन्सर आहे, तर याचा इलाज संभव होऊ शकतो. मग आता प्रश्न असा येतो की अखेर पहिल्या पायरीत असताना कॅन्सर आहे हे कसं कळून येईल, म्हणून आज आम्ही कॅन्सरच्या काही सुरुवातीच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत जी ओळखून तुम्ही लगेचच इलाज करू शकता. यामध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो-

वजन घटणं

इमेज स्रोत: besthealthyblog.com

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालानुसार जेव्हा कोणत्याही व्यक्तीचं ४ ते ५ किलो वजन अचानकपणे कमी होतं तेव्हा हे कॅन्सरचं सर्वात पहिलं लक्षण असू शकतं. हे मुख्यत्वे पॅन्क्रिअॅटिक (स्वादुपिंडाच्या), पोटाच्या, फुफ्फुसाच्या किंवा एनोफेगल कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

त्वचेवरील तीळ किंवा चामखीळांमध्ये बदल होणं

इमेज स्रोत: onlymyhealth.com

तुम्ही पाहिलं असेल की काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर तीळ किंवा चामखीळ असतात, जे की सर्वसाधारण आहे. पण जेव्हा त्यांच्या आकारात बदल होऊ लागतो किंवा त्यांचा रंग अधिक गडद होऊ लागतो तेव्हा हे त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. अशा वेळी तिळाच्या आसपासच्या त्वचेचा रंग जर बदलू लागला तर त्याचा लवकरात लवकर इलाज करून घ्या.

रक्तस्रावाची समस्या

इमेज स्रोत: Wikihow

जर एखाद्या व्यक्तीला खूप दिवस खोकल्याची समस्या असेल आणि त्यादरम्यान त्याचं रक्त निघत असेल, आणि त्यासोबतच बऱ्याच काळासाठी तुम्हाला कफ झाला असेल तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. अशा प्रकारची लक्षणं आढळताच त्वरित डॉक्टरला संपर्क करा.

पोटदुखीची समस्या

इमेज स्रोत: Zee news

जेव्हा एखाद्या व्यक्तीला सातत्याने पोटदुखीसोबत भूक न लागणं, कधीकधी रक्ताची उलटी होणं, रक्ताची कमतरता, पातळ जुलाब होणं इत्यादी सारखी कोणतीही समस्या असेल तेव्हा तिला चुकूनसुद्धा दुर्लक्षित करू नका. कारण ही पोटाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात.

स्तनात गाठ

इमेज स्रोत: Khoosurati

जेव्हा एखाद्या स्त्रीला स्तनामध्ये गाठीचा त्रास असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण हे स्तनाच्या कॅन्सरचं कारण असू शकतं. ही समस्या त्या स्त्रियांमध्ये जास्त आढळून येते ज्या अधिक प्रसव किंवा ज्या बाळाला स्तनपान देत नाहीत.

तोंडामध्ये फोड किंवा गाठ

इमेज स्रोत: fotocdncube.com

जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या तोंडात एखादी गाठ, जखम, तोंडात पांढरे डाग, लाळ टपकणे, तोंडाला दुर्गंधी येणे, तोंड उघडताना, बोलताना किंवा अन्न गिळताना त्रास होणे, हे सर्व होत असेल तर ते तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण आहे.

फीचर इमेज स्रोत: betterdailyhabits.com

 

Translated by Anyokti Wadekar

loader