थंडीच्या मोसमात बाळांना द्यायचे ६ उत्तम अन्नपदार्थ

तुम्हाला जर असं वाटत असेल की हिवाळ्यात तुमचं मूल आजारी पडू नये तर तुम्ही त्याला व्हिटॅमिन सी आणि मिनरल्स असलेले अन्नपदार्थ खायला द्या. कारण या अन्नपदार्थांमुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट होते जी तुमच्या मुलाला कुठल्याही आजारापासून वाचवण्याचं काम करते. म्हणून खाली काही अशाच अन्नपदार्थांबद्दल सांगितलं गेलंय, जे अन्नपदार्थ तुम्ही थंडीच्या मोसमात तुमच्या मुलाला देऊ शकता. हे अन्नपदार्थ खालीलप्रमाणे आहेत-

संत्र्याचा रस

https://www.organicfacts.net

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं, ज्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला रोज संत्र्याचा रस द्या, पण लक्षात ठेवा हा रस घरी तयार केलेला आणि फ्रेश असायला हवा.

डाळ

https://www.yummytummyaarthi.com

डाळीमध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असतं, म्हणून तुम्ही तुमच्या मुलाच्या आहारात रोज डाळीचा समावेश जरूर करा. यामुळे मुलाला उपयुक्त असं पोषण देखील मिळेल आणि त्यामुळे त्याचा शारीरिक विकाससुद्धा होईल.

दूध आणि गूळ

https://www.boldsky.com

जेव्हा खूप कडाक्याची थंडी पडली असेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला दूध आणि गूळ देऊ शकता. कारण गुळाचा प्रभाव गरम असतो, म्हणून झोपताना मुलाला दूध आणि गूळ द्या.

बदाम

https://www.litepurse.in

तुम्ही तुमच्या एक वर्षाच्या मुलाला बदाम सुद्धा देऊ शकता, पण हे लक्षात ठेवा की ह्या वयाच्या मुलांना बदाम देताना थोडे भिजवलेले बदाम किसून दुधात मिसळून द्या. यामुळे मुलाला ऊब मिळेल. कारण बदाम हे प्रकृतीने गरम असतात.

हंगामी फळं आणि भाज्या

https://goqii.com

आपल्या छोट्याश्या बाळाला हंगामी फळं आणि भाज्या दोन्हींचा स्वाद घेऊ द्या. यासाठी तुम्ही त्यांचं सूप बनवून किंवा ज्यूस काढून २-३ चमचे देऊ शकता. हे थंडीच्या मोसमातच केवळ फायदेशीर ठरणार नाही तर यामुळे बाळाची रोगप्रतिकार यंत्रणा देखील बळकट होईल.

अंडं

http://www.seriouseats.com

अंड्याचा प्रभाव गरम असतो हे सर्वज्ञात आहे, अशात तुम्ही तुमच्या बाळाला थोडंफार अंडं देखील देऊ शकता. यामुळे तुमच्या मुलाच्या शरीराला नुसतीच ऊब मिळणार नाही, तर त्यामुळे तुमच्या बाळाच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील दूर होईल.

याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुलाला सकाळच्या वेळी उन्हात बसवा, यामुळे व्हिटॅमिन डी मिळतं, जे शरीरासाठी खूप उपयुक्त मानलं जातं.

 

Translated by Anyokti Wadekar

loader