थंडीच्या मोसमात आंघोळीच्या आधी त्वचेवर हे ४ पदार्थ लावा आणि मग बघा कमाल

थंडीच्या मोसमात चेहऱ्याचा रंग काळा पडणं ही खूप सर्वसाधारण गोष्ट आहे, एवढंच नाही तर या काळात चेहरा बराच निस्तेज होऊन जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही समस्या का उत्पन्न होते आणि यापासून तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता. यासाठी खाली काही अशा टिप्स सांगितल्या गेल्या आहेत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य थंडीच्या मोसमात देखील कायम ठेवू शकता. या टिप्स खालीलप्रमाणे आहेत-

कच्चं दूध

चेहरा धुण्याआधी कापसाचा बोळा दुधात बुडवा आणि त्याने पूर्ण चेहरा स्वच्छ करून घ्या. थोडा वेळ चेहरा नैसर्गिक हवेमध्ये सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून घ्या. कारण कच्चं दूध हेदेखील एक नैसर्गिक क्लीन्जर आहे, याच्या वापराने त्वचा उजळ होते आणि त्यासोबतच मुलायम सुद्धा बनते.

दही आणि कणकेचा स्क्रब

आंघोळीच्या आधी चेहरा आणि शरीर नैसर्गिकरीत्या स्क्रब करण्याचा प्रयत्न करा. स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही दह्यामध्ये कणकेचा कोंडा, बेसन आणि थोडीशी हळद मिसळून पेस्ट बनवून घ्या.

हे उटणं पूर्ण शरीरावर लावून हलक्या हाताने ३-४ मिनिटे रगडा आणि काही वेळाने पाण्याने धुवून टाका. असं केल्याने देखील तुमची त्वचा मुलायम राहील. याव्यतिरिक्त गरम दुधात रवा मिसळून बनवलेली पेस्ट सुद्धा स्क्रब म्हणून वापरता येऊ शकते.

दररोज मॉइश्चरायझर लावा

असं मॉइश्चरायझर लावा ज्यामध्ये तेल हा एक घटक असेल आणि जे वॉटर-बेस्ड नसेल. उदाहरणार्थ तुम्ही नाईट क्रीमचा वापर करू शकता. चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई युक्त क्रीम आणि अँटी-रिंकल क्रीम लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेची कोमलता कायम राहील. झोपण्याआधी पुन्हा एकदा मॉइश्चरायझर लावल्याने तापमानातल्या सूक्ष्म फरकामुळे त्वचेत ते चांगल्या प्रकारे शोषलं जाईल.

चेहऱ्याला मसाज करा

थंडीच्या मोसमाच्या आगमनासोबतच तुम्हाला तुमच्या त्वचेच्या आरोग्याकडे सुद्धा बरंच लक्ष द्यावं लागतं. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर रोज ऑलिव्ह ऑइल लावू शकता. ऑलिव्ह ऑइल लावण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे आंघोळीच्या अगदी आधी. हे तेल गळ्यापासून पायापर्यंत लावून मग चांगल्या प्रकारे सुकू द्या. एकदा का ते पूर्णपणे सुकलं की मग आंघोळ करून घ्या. असं केल्यावर तुम्हाला ताजंतवानं वाटेल आणि त्वचेच्या थरांमध्ये तेल मुरलेलं असल्याने तुमच्यात एक नवी स्फूर्ती संचारेल.

या सगळ्याव्यतिरिक्त, या गोष्टीही लक्षात ठेवा-

पायांची काळजी घ्या

थंडीत पायांची त्वचा एकदम कठोर होते कारण तिच्यात पुरेशी आर्द्रता राहात नाही. पायांना अशा प्रकारचं लोशन लावा ज्यात पेट्रोलियम जेली किंवा ग्लिसरीन असेल. याव्यतिरिक्त पायांना नियमितपणे स्क्रब देखील केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही कुठलंही क्रीम लावाल तर ते आतपर्यंत मुरेल.

खूप गरम पाण्याने आंघोळ करू नका

कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करू नका. आंघोळ करताना पाण्यामध्ये काही थेंब बेबी ऑइल, ऑलिव्ह ऑइल किंवा बॉडी ऑइलचे टाका. यामुळे तुमची त्वचा मुलायम राहील. या मोसमात 'स्टीम बाथ' घेणं त्वचेसाठी बरंच फायदेशीर असतं. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.

ओठांची काळजी घ्या

या ऋतूचा आपल्या ओठांवर फार वाईट परिणाम होतो म्हणून ओठांवर मलई किंवा एखादा चांगला लिप बाम लावला पाहिजे. आजकाल बाजारात खूपसे असे लिप बाम उपलब्ध आहेत ज्यामध्ये टी-ट्री ऑइल असतं. हा उपाय केल्याने ओठ मऊ, मुलायम, गुळगुळीत आणि गुलाबी राहतात.

या सगळ्याव्यतिरिक्त, शक्य तेवढं पाणी प्या आणि हिरव्या पालेभाज्या खा. यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि तुमच्या चेहऱ्यावरची चमक कायम राहील.

 

Translated by Anyokti Wadekar

loader