तुमच्या मुलाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हे ३ सोपे घरगुती उपाय आजच चालू करू शकता!

तुमच्या मुलाला पुन्हा खोकला झालाय का? तुमचं आयुष्य म्हणजे एक अशी न संपणारी गाथा झालंय का, ज्यामध्ये सतत अॅलर्जीची औषधं असतात आणि फक्त थोडेसेच निरोगी दिवस अधून मधून वाट्याला येतात?

बऱ्याच आयांना दरेक आठवड्याला चिंता लागून राहिलेली असते की त्यांच्या मुलाला अॅलर्जिक सर्दी किंवा खोकला होऊन मूल आजारी पडेल. वाहणारं/ चोंदलेलं नाक, ज्यामुळे मूल चिडचिडं होतं आणि काहीही खायला बघत नाही, हे प्रत्येक आईला पडणारं भयानक दुःस्वप्न आहे.

अशा वेळी आया प्रार्थना करतात की मुलाच्या अंगची निसर्गदत्त सरंक्षण यंत्रणा म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती कामाला लागो आणि मुलाला इन्फेक्शन्सशी लढण्याची शक्ती देवो.

काहीवेळा अन्नातील पोषणातल्या कमतरतेमुळे मुलांमधील रोगप्रतिकारशक्तीच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. मुलामधील पोषणविषयक कमतरता भरून काढल्यामुळे मूल आजारातून लवकर बरं होतं आणि लवकर पूर्वपदावर येतं. थोडेसे प्रतिबंधात्मक उपाय हे भरपूर उपचारांपेक्षा नेहमीच बरे असतात.

तोंडात चांदीचा चमचा

चांदी एक धातू म्हणून गुणधर्माने आॅलिगोडायनॅमिक किंवा बायोसायडल आहे. ह्याचा अर्थ असा की आजार पसरवणाऱ्या खूपशा सूक्ष्मजीवांना चांदी मारून टाकते, जसं की बॅक्टीरिया, फंगाय, व्हायरस, स्पोरस् इत्यादी.

म्हणून परंपरागत पद्धतीने, बाळांना पहिल्यांदा गायीचं दूध किंवा अन्न देताना चांदीच्या वाटीतून आणि चमच्यातून दिलं जातं. रोगकारक जंतूना मारण्याच्या गुणधर्मामुळे, पिण्याच्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी तसंच शस्त्रक्रियेतल्या ड्रेसिंग साठी आणि जंतुनाशकांमध्येही हा धातू आदर्श ठरतो.

बाळाला चांदीच्या वाटी आणि चमच्यातून भरवण्याचा प्रयत्न करा. धातूमुळे विषबाधा होईल की काय अशी काळजी करू नका कारण हा धातू विद्राव्य क्षारांच्या स्वरूपात असल्याशिवाय मानवी शरीराद्वारे पचवला जाऊ शकत नाही.

तुम्हाला ह्याचा फायदा लगेचच दिसून येईल.

प्रत्येक दिवशी थोडी तुळस

पवित्र मानली जाणारी तुळस ही भारतात देवदेवतांना वाहिली जाते. पण तुम्हाला माहितीय का, की तुळशीचे खूप सारे आरोग्यविषयक फायदे आहेत? आयुर्वेदामध्ये तुळस ही अडॅप्टजन म्हणून वापरली जाते आणि सर्दीखोकल्याच्या लक्षणांवर रामबाण उपचार म्हणून सांगितली जाते.

असं असलं तरी, सर्वसाधारण सर्दी आणि इन्फेक्शन्स वर उत्तम प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनही तुळशीचा वापर होऊ शकतो, म्हणजेच लक्षणं दिसून येण्याआधीच रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही तुळस वापरू शकता.

घरात तुळशीचं रोपटं लावा आणि तुमच्या मुलाला दररोज दोन-तीन तुळशीची पानं खायला सांगा. पानं खुडून घ्या, धुवा आणि बोटांनी थोडी कुस्करून घ्या. जर तुळशीची तुरट चव तुमच्या मुलाला सहन होत नसेल, तर त्यात थोडा मध घाला.

'हनी', आय ग्रू द किड्स!

मधामध्ये अॅंटी-आॅक्सिडंट, अॅंटी-मायक्रोबियल आणि अॅंटी-बॅक्टीरियल गुणधर्म असतात ज्यामुळे व्हायरस, बॅक्टीरिया आणि फंगाय च्या इन्फेक्शन्सशी लढण्याची ताकद  मिळते. मधामुळे पचनसंस्था सुधारते, छातीतली जळजळ थांबते, घसा बसला असल्यास तो बरा होतो, खोकला बरा होतो, रक्तातल्या साखरेचं प्रमाण योग्य राहतं, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि जखमा आणि व्रण लवकर बरे होतात.

दुकानातून विकत घेतलेल्या मधापेक्षा स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेला मध नेहमीच चांगला असतो कारण त्यामध्ये तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या परागकणांशी आणि अॅलर्जन्सशी लढण्यासाठी आवश्यक असे गुणधर्म असतात.

सूचना: १ वर्ष वयाखालील मुलांना मध देण्यास डॉक्टर मनाई करतात.

Translated by Anyokti Wadekar

loader