बारीक दिसण्यासाठी सेलिब्रिटीजची १५ अदभुत, नवीन ब्लाऊज सिक्रेट्स!

ब्लाऊज हा असा पोशाख आहे जो लेहेंगा, साडी किंवा जर तुम्हाला वाटलं तर हाफ साडीवरही घातला जाऊ शकतो. असा हा बहुगुणी पोशाख चांगल्या फिटिंगचा असणं, त्याचं कापड चागलं निवडलेलं असणं, तो साडीबरोबर चांगला मॅच होणं आणि फॅशनेबल असणं महत्त्वाचं आहे.

आपण पाहिलं असेल की, स्टार अभिनेत्र्यांनी साडी नेसली की त्यांचे फोटो काढत फोटोग्राफर्स सगळीकडे त्यांच्या पाठोपाठ जातात. ऑक्टोबरमध्ये जो लग्नाचा सीझन येणार आहे त्याच्या तयारीसाठी ब्लाऊजच्या आयडियांची एक सर्वोत्कृष्ट अशी यादी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. नाही, ही काही घाई नाही झाली. योग्य कापड निवडणं, टेलर निवडणं, एम्ब्रॉयडरी, फिटिंग ह्या सगळ्यासाठी जवळजवळ दोन महिने तर जातातच! हो तुम्ही वाचलं ते बरोबर आहे. दोन महिने तर जातात आणि कुठची तरी स्थानिक भाषा बोलणाऱ्या एखाद्या टेलरला, ज्याच्या हातात आणि एम्ब्रॉयडरीमध्ये जणू काही जादू असते, त्याला तुमच्या ब्लाऊज मध्ये तुम्हाला नेमकं काय हवंय हे समजावता समजावता आपला अक्षरशः घाम निघतो. एक सल्ला: टेलरशी कधीही वाद घालू नका. तो जर म्हणत असेल की एखादा पॅटर्न नाही बनवला जाऊ शकत, तर त्याला फक्त ह्या लेखातले फोटो दाखवा आणि तो मग लगेच तसा ब्लाऊज बनवून द्यायला तयार होईल. आणि हो, आई असलेल्या स्त्रियांनो, आमचं तुमच्यावर प्रेम आहे!

आई असलेल्या स्त्रियांनो, तुमचं ह्याकडे लक्ष असू द्या, की यापैकी बऱ्याचश्या स्टाईल्स स्लीव्हलेस असल्या तरी त्यांच्या स्वाभाविक अशा कट मुळे त्या-त्या बॉडी टाईप वर तो ब्लाऊज घातल्यास तुम्ही आहात त्यापेक्षा बारीक दिसता.

१. पारंपरिक कट निवडा

ब्लाऊजच्या अशा प्रकारच्या कट मुळे भरदार छातीकडे लक्ष न जाता अरुंद, नाजूक गळ्याकडे लक्ष वेधलं जातं. आणि तुम्हाला याचीच गरज आहे.

२. पातळ, पारदर्शक कापड

अशा प्रकारच्या पातळ, पारदर्शक कापडाचं सौन्दर्य अधिक खुलवण्यासाठी पाठीवर एखादं छानसं डिझाईन करून घ्या, त्यामुळे पाठीवरच्या वळ्यांकडेही लक्ष जाणार नाही.

३. वेलवेट ची चकाकी

वेलवेट च्या ब्लाऊज बरोबर सोनेरी रंगाची पातळ, पारदर्शक कापडाची साडी नेसलीत तर तुमच्या कमरेच्या साईझकडे कोणाचंही लक्ष जाणार नाही. हा ब्लाऊज इतका राजेशाही दिसतो की सगळं लक्ष ब्लाऊजकडेच जातं.

४. सोनेरी आणि सुंदर

तुमच्या ब्रोकेडच्या आणि बनारसी साड्यांवर घालण्यासाठी हा खूप सुंदर असा शोभून दिसणारा ब्लाऊज आहे. एखाद्या चांगल्या टेलरकडून ब्लाऊजच्या आत बस्टिअर सारखी रचना करून घ्या ज्यामुळे तो छातीला बरोबर फिट होईल आणि ब्लाऊज मधून योग्य तितकंच अंग दिसेल!

५. साधा तरीही सेक्सी

एखाद्या भरदार नक्षीच्या साडी वर हा ब्लाऊज घातलात तर एक क्लासी लुक येईल. मोठे झुंबरासारखे लटकन लावल्यामुळे पाठीत काही दोष असल्यास लपला जातो आणि आपला लुक फ्रेश तरीही सुसंस्कृत असा दिसतो.

६. स्लीक डिझाइन्स

जेव्हा तुमची पाठ मिरवण्यासारखी असते. ज्या स्त्रियांचा नितंबाकडचा भाग मोठा आहे आणि ज्यांना आपल्या कमरेच्या वरच्या शरीराकडे लक्ष वेधायचंय त्यांच्यासाठी हा ब्लाऊज परफेक्ट आहे.

७. खांद्यावरचं नक्षीकाम ज्यामुळे तुम्ही बारीक दिसता

ज्या स्त्रियांचे दंड मोठे आहेत त्यांच्यासाठी गळ्याजवळचं हे नक्षीकाम परफेक्ट आहे. पातळ, पारदर्शक कापडाच्या लहान स्लीव्हज् लावल्या तर फारच चांगला लुक तयार होऊ शकतो. गळ्याजवळच्या ह्या नक्षीकामामुळे बघणाऱ्याचं लक्ष वेधलं जातं.

८. एम्ब्रॉयडरी

हा संध्याकाळच्या वेळेसाठीचा ग्लॅमरस लुक आहे. आडव्या पट्ट्यांची नक्षी असलेल्या साडीमुळे जो एक रुंद असा लुक येतो तो ह्या ब्लाऊज वरच्या फुलाफुलांच्या एम्ब्रॉयडरी मुळे नकळत लपला जातो. एखाद्या साडीत जर तुम्ही जाड दिसत असाल तर हा ब्लाऊज वापरून पाहा.

९. एकरंगी ब्लाऊज

पारंपरिक पद्धतीच्या बहुतेक साड्यांवर हा लुक शोभून दिसतो. ह्या एकरंगी ब्लाऊजच्या लांब स्लीव्हज् मुळे ठेंगणी असलेली विद्या उंच दिसते.

१०. जॅकेट ब्लाऊज

 

हिवाळ्यामध्ये असे ब्लाऊज वापरा. जॅकेट वरच्या भरदार नक्षीकामामुळे तुम्हाला ऊब मिळेल, तुम्ही बारीक आणि स्टायलिशही दिसाल.

११. पंख फडफडवा

निम्रत कौर चा ब्लॅक रफल्स वाला हा लुक उन्हाळ्यातल्या संध्याकाळच्या पार्ट्यांसाठी परफेक्ट आहे. रफल्स मुळे ब्लाऊजला उन्हाळी फॅशन चा एक लुक येतो, तुम्ही तरुण दिसता आणि दंडांच्या वरच्या भागावरचं फॅट लपलं जातं.

१२. ट्रेण्डच्या विरुद्ध

एखाद्या बोअरिंग दिसणाऱ्या साडीवर हा ब्लाऊज वापरून पाहा. साध्या फुलांच्या नक्षीवाल्या साडीवर हा परंपरेच्या विरुद्ध असा ब्लाऊज घालून तुमचा स्टाईल कोशंट वाढवल्याबद्दल तुमचे मित्रमैत्रिणी तुमचं कौतुक करतील.

१३. अत्याधुनिक

पारंपरिक एम्ब्रॉयडरीच्या भपकेबाजी पेक्षा ज्यांना आरामदायकपणा हवा आहे त्या सगळ्या आयांसाठी हा ब्लाऊज आहे. ह्या एकरंगी लुक मुळे तुम्ही झटक्यात बारीक दिसू लागाल.

१४. एका बाहीचा ब्लाऊज

ह्या ब्लाऊज मुळे तुम्ही बारीक आणि फॅशनेबल दिसता. तुमच्या टेलरला त्याचं फिटिंग व्यवस्थित करायला सांगा.

१५. बंद गळ्याचा ब्रोकेडचा ब्लाऊज

तुमच्या साडीकडे लक्ष न जाता ब्लाऊजकडे जावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा ब्लाऊज वापरून पाहा. ह्या ब्लाऊजच्या पाठीमागच्या बंद गळ्यामुळे तुम्ही आश्चर्यकारकपणे बारीक आणि उंच दिसू लागता.

तुमच्या बॉडी टाईप साठी कोणती साडी नेसायची ते इथे वाचा.

Translated by Anyokti Wadekar

loader